

रत्नागिरी, 21 जानेवारी, (हिं. स.) : रामचंद्र सप्रे स्मृती एच२ई पॉवर सिस्टीम प्रस्तुत महाराष्ट्र राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेतून होसूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी एकूण ९ जणांची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली. रत्नागिरीच्या सौरीशचा महाराष्ट्र संघात समावेश झाला आहे.
फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली. तो संघ असा -
२३०० रेटिंगखालील गट : इंद्रजित महिंद्रकर – छत्रपती संभाजीनगर, आदित्य सावळकर – कोल्हापूर
२००० रेटिंगखालील गट : निर्वाण शाह – मुंबई शहर, सौरीश कशेळकर – रत्नागिरी
१७०० रेटिंगखालील गट : संघर्ष औळे – चंद्रपूर, अभिजय अनिरुद्ध वाळवेकर – पुणे
१७०० रेटिंगखालील महिला : साजिरी देशमुख– सातारा, महुआ देशपांडे – मुंबई उपनगर
२००० रेटिंगखालील सर्वोत्तम महिला : घोलप प्रिशा – रायगड, कबनूरकर शर्वरी – कोल्हापूर
सविस्तर बक्षिसांची यादी अशी -
खुला गट : निर्वाण शाह, इंद्रजित महिंद्रकर, सौरीश कशेळकर, आदित्य सावळकर, अनिश गोडसे, कौस्तव बराट, संजय शेजळ, शुभम लाकूडकर, संघर्ष औळे, विहान अग्रवाल.
२००० रेटिंगखालील गट - सागर शेनॉय, आदित्य चव्हाण, गणेश ताजणे, वरद पाटील, ऋषिकेश कबनूरकर.
१७०० रेटिंगखालील गट - अभिजय वाळवेकर, वरद मोरे, श्रीश कुलकर्णी, नोव्हा अय्यर जुयाल, अंबर गंगवाल.
सर्वोत्तम महिला स्पर्धक म्हणून प्रिशा घोलप, शर्वरी कबनूरकर, साजिरी देशमुख, महुआ देशपांडे, दुर्वा बोम्बळे यांची निवड झाली.
१५ वर्षांखालील सर्वेश पोतदार, आराध्य केंजळे, आरुष सरोदे, वेदांग असनीकर, ऋतुराज पांचाळ, १३ वर्षांखालील ओम रामगुडे, कश्यप खखारिया, नैतिक पटवर्धन, आयुष रायकर, रेयांश जैन, ११ वर्षांखालील मेधांश पूजारी राघव पावडे, शौर्य भोंडवे, सर्वज्ञ बलगुडे, अगस्त्य कसाट, ९ वर्षांखालील आरव झवर, अद्वैत कुलकर्णी, आदिराज डोईजड, अभिनंदन अरिकृष्णन, प्रियन साळुंखे, ५५ वर्षांवरील गट- सुहास कामतेकर, अतुल भालेराव, अशोक देसाई, गिरीश तोरवेकर.
सर्वोत्तम रत्नागिरी जिल्हा खेळाडू- सोहम रुमडे साहस नारकर, अक्षय खेर, साईप्रसाद साळवी, मानस सिधये.
स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ माळनाका येथील मराठा भवन हॉल येथे झाला. या समारंभाला प्रतिथयश उद्योजक व चेसमेन रत्नागिरी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केजीएन सरस्वती फाउंडेशनचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष डॉ. शरद प्रभुदेसाई, डॉ. श्रीकृष्ण जोशी व जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी मंगेश मोडक व नितीन कानविंदे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.
नितीन कानविंदे यांनी आभार प्रदर्शन करताना सांगितले, २०१३ साली दिलीप नवरे यांनी लावलेल्या या स्पर्धारूपी रोपट्याचा आज वृक्ष झाला असून त्याच्या सावलीत आपण सर्व त्याची फळे चाखतो आहोत. खेळाडू, पालक, परीक्षक, पाध्ये गांधी हॉस्पिटलिटी सर्विसेस व पत्रकार बंधू भगिनींचे त्यांनी आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी