2025 मध्ये भारताच्या स्मार्टफोन बाजारात व्हिवो अव्वल
मुंबई, 21 जानेवारी, (हिं.स.)। 2025 हे वर्ष संपताना भारतीय स्मार्टफोन बाजारात थोडी घसरण दिसली असली, तरीही हे वर्ष उद्योगासाठी महत्त्वाचे ठरले आहे. रिसर्च फर्म Omdia च्या अहवालानुसार, व्हिवोने 2025 मध्ये भारताच्या स्मार्टफोन बाजारात पहिले स्थान पटकाव
Vivo


मुंबई, 21 जानेवारी, (हिं.स.)। 2025 हे वर्ष संपताना भारतीय स्मार्टफोन बाजारात थोडी घसरण दिसली असली, तरीही हे वर्ष उद्योगासाठी महत्त्वाचे ठरले आहे. रिसर्च फर्म Omdia च्या अहवालानुसार, व्हिवोने 2025 मध्ये भारताच्या स्मार्टफोन बाजारात पहिले स्थान पटकावले आहे. कंपनीने वर्षभरात 3.21 कोटी स्मार्टफोन शिप केले असून 21 टक्के मार्केट शेअर मिळवला आहे. यावरून मिड-रेंज आणि बजेट सेगमेंटमध्ये व्हिवोची पकड सातत्याने मजबूत होत असल्याचे स्पष्ट होते.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग राहिली आहे. सॅमसंगने 2025 मध्ये 2.3 कोटी युनिट्सची शिपमेंट केली असून बाजारातील 15 टक्के हिस्सा मिळवला आहे. मात्र 2024 च्या तुलनेत सॅमसंगच्या विक्रीत 11 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर चीनच्या ओप्पो आणि शाओमी या कंपन्या संयुक्तपणे आहेत. दोन्ही कंपन्यांनी 13-13 टक्के मार्केट शेअर मिळवला आहे. ओप्पोने 2 कोटी युनिट्सची विक्री केली, तर शाओमीने 1.97 कोटी स्मार्टफोन शिप केले आहेत. चौथ्या क्रमांकावर अमेरिकेची दिग्गज कंपनी अ‍ॅपल राहिली असून तिचा मार्केट शेअर 10 टक्के आहे. अ‍ॅपलने या वर्षात एकूण 1.51 कोटी आयफोन युनिट्स विकले आहेत.

एनुअल ग्रोथच्या बाबतीत अ‍ॅपलने आघाडी घेतली आहे. 2025 मध्ये अ‍ॅपलच्या विक्रीत 28 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर व्हिवो असून त्यांच्या विक्रीत 19 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तिसऱ्या क्रमांकावर ओप्पो असून त्यांच्या विक्रीत 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र शाओमीला सर्वाधिक फटका बसला असून त्यांच्या स्मार्टफोन विक्रीत 26 टक्क्यांची घट झाली आहे.

एकूण आकडेवारीनुसार, भारतात 2025 मध्ये 15.42 कोटी स्मार्टफोन विकले गेले असून ही संख्या 2024 च्या तुलनेत सुमारे 1 टक्क्यांनी कमी आहे. चौथ्या तिमाहीतही व्हिवो अव्वल राहिले. कंपनीने Q4 2025 मध्ये 79 लाख स्मार्टफोन शिप करून 23 टक्के मार्केट शेअर मिळवला आहे. सॅमसंगने 49 लाख युनिट्ससह 14 टक्के हिस्सा मिळवला, तर ओप्पोने 46 लाख युनिट्ससह 13 टक्के, शाओमीने 42 लाख युनिट्ससह 12 टक्के आणि अ‍ॅपलने 39 लाख आयफोन शिप करून 11 टक्के हिस्सा मिळवला आहे. या तिमाहीत व्हिवोची विक्री 16 टक्के आणि ओप्पोची 10 टक्के वाढली, तर सॅमसंग आणि शाओमीच्या विक्रीत घट झाली.

व्हिवोसाठी Y31 5G, Y19s 5G, T4x 5G आणि V60e हे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल्स ठरले. ओप्पोच्या A-सीरिज आणि शाओमीच्या Redmi 14C 5G तसेच Poco C75 या मॉडेल्सनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. Omdia च्या मते, 2026 मध्ये भारताचा स्मार्टफोन बाजार मिड सिंगल डिजिट म्हणजेच सुमारे 5 टक्क्यांपर्यंत घटू शकतो. वाढत्या किंमती आणि लोकांकडून फोन अपग्रेड करण्यात होणारा उशीर ही यामागची प्रमुख कारणे मानली जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande