अमरावती मनपात राष्ट्रवादीच्या गटनेता पदी अविनाश मार्डीकर यांची निवड
अमरावती, 26 जानेवारी (हिं.स.)। नुकत्याच झालेल्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ११ जागा मिळाल्या आहेत .महाराष्ट्र शासनाने मनपा निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे गॅझेट प्रसिद्ध केल्यानंतर आता महापालिकेतील गटनेता निव
अमरावती महानगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेता पदी अविनाश मार्डीकर यांची निवड


अमरावती, 26 जानेवारी (हिं.स.)।

नुकत्याच झालेल्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ११ जागा मिळाल्या आहेत .महाराष्ट्र शासनाने मनपा निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे गॅझेट प्रसिद्ध केल्यानंतर आता महापालिकेतील गटनेता निवडीला घेऊनही राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू आहेत त्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अविनाश गुलाबराव मार्डीकर यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे अमरावती महानगर पालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून अविनाश मार्डीकर यांच्या समवेत मंगेश मनोहरे,मनीष बजाज, प्रमोद महल्ले, चंदू खेडकर, शेख जफर, रतन डेंडुले, सौ मीनल योगेश सवाई, सौ अर्चना मनीष पाटील, सौ. ममता संदीप आवारे, तसेच गुड्डू उर्फ प्रशांत धर्माळे असे ११ नगरसेवक नवनिर्वाचित झाले आहेत. येत्या ३० जानेवारी रोजी महापालिकेत होणाऱ्या महापौर व उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेता पदी अविनाश मार्डीकर यांची निवड करण्यात आली आहे आज राष्ट्रवादीच्या सर्व नव- नवनिर्वाचित नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे महासचिव (संघटन)आमदार संजय खोडके तसेच आमदार सौ. सुलभाताई खोडके यांची भेट घेतली. यावेळी आमदार महोदयांच्या वतीने गटनेता अविनाश मार्डीकर तसेच सर्व ११ नगरसेवक यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

अविनाश मार्डीकर हे महानगरपालिकेतील जेष्ठ नगरसेवक असून एक अभ्यासू व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी महापालिकेत स्थायी समितीचे सभापतीपद देखील भूषविले असून विविध समित्यांवर काम करण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील त्यांचे मानाचे व मोलाचे स्थान असून आमदार संजय खोडके यांचे अत्यंत निकटवर्ती व विश्वासू म्हणूनही त्यांची ख्याती आहे. अमरावती महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून गटनेता पदी अविनाश मार्डीकर यांची निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande