विद्यापीठ शिक्षक पतसंस्था अध्यक्षपदी डॉ. देशमुख
छत्रपती संभाजीनगर, 26 जानेवारी (हिं.स.)।डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. सचिन देशमुख, उपाध्यक्षपदी डॉ. सुधाकर शेंडगे यांची तर सचिवपदी डॉ. शशांक सोनवणे यांची निवड झाली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव
विद्यापीठ शिक्षक पतसंस्था अध्यक्षपदी डॉ. देशमुख


छत्रपती संभाजीनगर, 26 जानेवारी (हिं.स.)।डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. सचिन देशमुख, उपाध्यक्षपदी डॉ. सुधाकर शेंडगे यांची तर सचिवपदी डॉ. शशांक सोनवणे यांची निवड झाली आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव पदासाठी सहायक निबंधक ज्ञानेश्वर मातेरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. अध्यक्षपदासाठी डॉ. देशमुख, उपाध्यक्षपदासाठी डॉ. शेंडगे व सचिवपदासाठी डॉ. सोनवणे यांचा एकच अर्ज आला. त्यामुळे या तीनही पदासाठी निवड झाल्याचे मातेरे यांनी जाहीर केले. निवडीनंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा माजी अध्यक्ष डॉ. सतीश दांडगे यांच्या हस्ते सत्कार झाला. या वेळी पतसंस्थेचे संचालक डॉ. संजय साळुंके, डॉ. पुष्पागायकवाड, डॉ. बोराडे, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. चंद्रकांत कोकाटे, डॉ. आनंद उबाळे, डॉ. पांचाळ, सतीश भगवान साखळे आदींची उपस्थिती होती. निवडणूक निर्णय अधिकारी यांना कार्यालयीन कर्मचारी अशोक निकम, प्रभाकर सुरळे आदींनी सहकार्य केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande