कन्नडमध्ये निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर, 26 जानेवारी (हिं.स.)। राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निःस्वार्थ, निर्भय व प्रामाणिकपणे मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली कन्नडमध्ये निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने ''राष्ट्रीय मतदार दिवस'' उत्साहात साजर
कन्नडमध्ये निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम


छत्रपती संभाजीनगर, 26 जानेवारी (हिं.स.)। राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निःस्वार्थ, निर्भय व प्रामाणिकपणे मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली

कन्नडमध्ये निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने 'राष्ट्रीय मतदार दिवस' उत्साहात साजरा करण्यात आला येथील जवाहर नवोदय विद्यालयात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले. याच निमित्ताने कन्नड तहसील प्रशासनाच्या वतीने 'माझा भारत, माझे मत' या संकल्पनेवर आधारित 'राष्ट्रीय मतदार दिवस' उत्साहात साजरा करण्यात आला.

निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार सारिका भगत, नायब तहसीलदारदिलीप सोनवणे व प्रशांत काळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निर्भयपणे मतदान करण्याची शपथ घेतली. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीएलओंचा सत्कार करण्यात आला, तसेच नवमतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. लोकशाही बळकटीकरणासाठी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाने केले. प्रवीण दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले, तर योगेश पाटील यांनी आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande