
नाशिक, 26 जानेवारी (हिं.स.)
जिल्ह्याचा प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये वनविभागाच्या एका कर्मचारी महिलेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव भाषणामध्ये न घेतल्याने महाजनांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्न केला यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
प्रथेप्रमाणे नाशिक जिल्ह्याचा मुख्य प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पोलीस परेड मैदानावरती सुरू होता .परेड झाल्यानंतर या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश महाजन हे संबोधित करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही या कारणावरून वनविभागामध्ये असलेल्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सहभागी झालेल्या माधवी जाधव या महिला कर्मचाऱ्याने अचानक परेड मधून निघून गिरीश महाजन यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला .ही घटना पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने या माधवी जाधव महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले त्यानंतर त्यांनी सरकार वाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यामध्ये या महिलेला देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे. ज्यावेळी माधवी जाधव ही महिला कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात होती त्यावेळी संविधानाचा गिरीश महाजन यांनी अवमान केला आहे अशा स्वरूपाचे वक्तव्य केले आणि मला निलंबित केले तरी काहीही फरक पडत नाही कारण संविधान महत्त्वाचे आहे अशा स्वरूपाचा आरडाओरडा केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV