प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांना त्रेतायुग फाउंडेशनचा 'नॅशनल प्राईड अँड एक्सलन्स अवॉर्ड 2026' जाहीर
परभणी, 26 जानेवारी (हिं.स.)।येथील शारदा महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख तथा माजी संचालक, विद्यार्थी विकास विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची आयोध्या, उत्तर प्रदेश येथील त्रेतायुग फाउंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या
प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांना अयोध्या येथील त्रेतायुग फाउंडेशनचा 'नॅशनल प्राईड अँड एक्सलन्स अवॉर्ड 2026' जाहीर


परभणी, 26 जानेवारी (हिं.स.)।येथील शारदा महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख तथा माजी संचालक, विद्यार्थी विकास विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची आयोध्या, उत्तर प्रदेश येथील त्रेतायुग फाउंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या 'नॅशनल प्राईड अँड एक्सलन्स अवॉर्ड 2026' साठी निवड करण्यात आली आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे यांच्या शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान प्रजासत्ताक दिनी, 26 जानेवारीला करण्यात येणार आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन पवार उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, डॉ. एन. व्ही. सिंगापूरे, सुरेश जयपूरकर व महाविद्यालयातील सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande