
लातूर, 26 जानेवारी (हिं.स.)।आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मदनसुरी जिल्हा परिषद गटासह चिंचोली (स) मदनसुरी आणि सरवडी पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्राचारार्थ प्रचार सभा संपन्न मदनसुरी येथील प्रचार सभेला चिंचोली (स) सरवडीसह
परिसरातील मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ करिता निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून आता प्रचाराला सुरुवात करण्यात आली असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकितील उमेदवारासाठी त्यांचे पक्ष व नेतेमंडळी यांच्याकडून जाहीर प्रचार सभा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्राचारार्थ राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी निलंगा तालुक्यातील मदनसुरी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस उमेदवार सिंधू अजित माने, पंचायत समितीच्या मदनसुरी गणातील जयश्री ज्ञानोबा सुरवसे,चिंचोली (स) गणातील सिंधू ज्ञानोबा हजारे, सरवडी जिल्हा परिषद गटातील कमलाबाई नेलवाडे व पंचायत समिती गणातील राऊ संजय पाटील तसेच कोकळगाव गणातील शिवनंदा स्वामी या उमेदवारांच्या प्रचारार्थ मदनसुरी या ठिकाणी जाहीर प्रचार सभा पार पडली.काँग्रेस उमेदवारांच्या प्राचारार्थ आयोजित या जाहीर प्रचार सभेला मतदाराचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निमित्ताने आयोजित प्रचार सभेत लातुरची, निलंग्याची दिशा ठरविण्यासाठी एकत्रित आलेले आहोत.
शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे आपली अस्मिता असून त्यांचे विचार आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावर आपण वाटचाल करीत आहोत.
आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना शेकडो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला ज्यातून अनेक विकासाच्या योजना राबविल्या गेल्या. पण काही वर्षे आपण पाहत आहोत एखादी सरकारी योजना घायची म्हटले तर अर्जावर पैसे ठेवल्या शिवाय कागद पुढं सरकत नाही असा भ्रष्टाचाराने बरबटलेला कारभार सद्या सुरू असून लातुर जिल्हा परिषद व पंचायत समिती सोबतच लातुर महानगर पालिकितील कारभार हा या पुढे भ्रष्टाचार मुक्त,स्वच्छ व पारदर्शक करण्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला.
पुढे बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, महानगरपालिका निवडणुकीत आपण लातुरवर तिरंगा फडकवला असून आता या निवडणुकीत निलंगा आणि मदनसुरीवर आपल्याला तिरंगा फडकवायचा असून त्यासाठी आपण तयार रहावे असे म्हणत येणाऱ्या काळात आपल्याला महाराष्ट्रात बदल घडवायचा असून याची सुरुवात लातुर मनपा पासून झाली आहे आणि येणाऱ्या ५ फेब्रुवारी ला आपल्याला दाखवून द्यायचे आहे आपला लातुर जिल्हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे.
आपल्या मतदार संघात मोठ्या प्रमाणावर निधी आल्याच्या गप्पा मारल्या जातात,पण विकास दिसत नाही,सिंचन व्यवस्था नाही,रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे हे संपूर्ण चित्र पाहता शासनाच्या निधीचा अपव्यय यांनी केला आहे आणि याकडे औसा व निलंगा पाहायला तयार नाही यामुळेच आता याकडे पाहायला लातूर आलेले असून निलंग्याचे विकास कामाच्या बाबतीतले मागासलेपन दूर करण्यासाठी आपल्याला यापुढे काम करायचे आहे.
येणाऱ्या काळात या भागातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या अडचणी शिल्लक राहणार नाहीत यासाठी एक धोरण तयार करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या जातील असा शब्द त्यांनी यावेळी आमदार अमित देशमुख यांनी दिला.
पुढे बोलताना आमदार अमित देशमुख म्हनाले की, लातुर जिल्ह्यातील विकास कामाच्या निधीत टक्केवारी,सामान्य माणसाची पिळवणूक,सोयाबीला भाव नाही,वेळेत सोयाबीन खरेदी नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे आश्वासन निवडणुकीत दिले ज्याची अजून अंमलबजावणी झाली नाही,महागाई वाढतच आहे,नुकतेच तांबाळा येथील आपल्या एका महिला उमेदवाराचे अपहरण झाले अशी गुंडगीरी सद्या सुरू आहे आणि या सर्व प्रकारांना रोखणे ही आता काळाची गरज बनली आहे असून येणाऱ्या काळात आपल्या भागाचा विकास करण्यासाठी एक व्यवस्था आपल्याला निर्माण करायची असून या साठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपल्याला चांगले उमेदवार विजयी करून पाठवायचे असून असे उमेदवार काँग्रेस महाविकास आघाडीने दिलेले असून आपण या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून द्यावेत असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती म्हणजे मिनी मंत्रालय असून याच्या अनेक विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात आणि योजना चांगल्या प्रकारे राबविण्यात याव्यात यासाठी त्या ठिकाणी जाणारे आपले लोकप्रतिनिधी देखील चांगलेच हवेत आणि ते आपल्याला या निवडणुकीच्या देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे त्याचा आपण उपयोग करून घ्यावा आणि आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून द्यावेत असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात केंद्रात आपले सरकार जरी नसले तरी आपल्या हक्काच्या योजना त्यासाठी लागणारा निधी हा आपला कायद्याने पवित्र संविधानाने दिलेला अधिकार असून आपला निधी कोणीही रोखू शकत नाहीत हे आपण लक्षात घेणे गरजेचे असून विरिधकांच्या भूल थापाना आपण अजिबात बळी न पडता सर्व सामान्य कुटुंबातील असलेल्या, आपल्या अडचणीत धाऊन येणाऱ्या आपल्या उमेदवाराना प्रचंड मतांनी आपण निवडून द्याल अशी अपेक्षा त्यानी यावेळी व्यक्त केली.
यावेळी बोलताना श्रीशैल्य उटगे म्हणाले की, लातुर मनपाची निवडणूक झाली आणि या निवडणुकीत मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री ,अनेक आमदारांनी मनपात भाजपची सत्ता आणावी असे लातुर वासीयांना आवाहन केले पण लातुर वासीयांनी या आवाहनाला न जुमानता आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि त्याच्या विचारावर चालणाऱ्या लातूरच्या अस्मितेला प्राधान्य देत काँग्रेसला पसंती दिल्याचे त्यांनी सांगितले. आणि आपल्याला परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने मताचा अधिकार दिला असून आपण आमच्या या अधिकाराचा वापर करून आमच्या उमेदवाराणा निवडून द्यावे अशी विनंती त्यांनी उपस्थिताना केली.
यावेळी बोलताना म्हणाले की,ऍड.उदय गवारे म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात असलेल्या सरकारने शेतकरी विरोधी धोरणे राबवली ज्या बळीराजाचे कष्ट कमी होण्याऐवजी वाढतंच आहेत.शेतमालाला भाव नाही,बेरोजगारी वाढत आहे.सरकार म्हणते लाडक्या बहिणीना महिन्याला दीड हजार देतो पण या सरकारने एकीकडे प्रचंड महागाई करून आमचे पाकीट मारायचे काम केले असून त्यातुन लाडक्या बहिणीना दीड हजार देत असल्याचे सांगतात तेव्हा आपण सर्वांनी या सरकार पासून सावध व्हावे आणि काँग्रेस अघाडीच्या उमेदवाराना जिल्हा परिषद व पंचायत समितीत विजयी करून पाठवावे अशी विनंती त्यांनी केली.
या जाहीर प्रचार सभेत किशोर टोम्पे, अजित माने यांनी आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थित सर्व मतदारांनी आपल्या उमेदवाराना भरभरून मतरुपी आशीर्वाद द्यावेत आणि सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis