
अमरावती, 26 जानेवारी (हिं.स.)।
चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन असून थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील पर्यटक हजेरी लावतात. येथील जंगल सफारी व व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. येथील आशिया खंडातल्या सर्वांत लांब स्कायवॉकचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. स्कायवॉक प्रकल्पाची लांबी ४०७ मीटर इतकी आहे तर याचे काम पूर्ण करण्यासाठी ४०.२६ कोटी इतके निधी खर्च होणार आहे.
या प्रकल्पाचे काम २०१९ मध्ये सुरू झाले असून मार्च २०२६ ही डेडलाईन आहे. त्या पद्धतीने ठेकेदार कामाला गती देत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला तर या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढणार आहे. या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्ती होईल. स्थानिकांच्या हातामध्ये पैसा खेळेल. स्कायवॉक हरिकेन पॉईंट ते गोराघाट पॉईंटला जोडणारा आहे. या दोन पॉईंटच्या दरी मध्ये हा स्कायवॉक बांधण्यात आलेला आहे. हा स्कायवॉक जवळपास पूर्ण झाला आहे. १५ टक्के काम शिल्लक आहे. स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पर्यटक देखील आनंदीत झाले आहे.
स्कायवॉकचे स्ट्रक्चर पूर्ण उभे झाले असून ठेकेदार पूर्ण ताकतीने काम करताना दिसून येत आहे. या टोकापासून तर त्या टोकापर्यंतचे लोखंडी स्ट्रक्चर पूर्ण झाले असून काच लावणे व इतर किरकोळ कामे पूर्ण व्हायला चार ते पाच महिन्याचा अवधी लागू शकतो. एका अधिकार्याने बोलताना सांगितले की, डेकचे काम आज पूर्ण झाले आहे. सपोर्टची सुद्धा तात्पुरती परवानगी मिळाली आहे. मार्चपर्यंत संपूर्ण स्कायवॉक काम पूर्ण होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी