'हेल्दी सिटी मॅरेथॉन' एक फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरात
छत्रपती संभाजीनगर, 26 जानेवारी (हिं.स.)। इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) छत्रपती संभाजीनगरच्या वतीने ''हेल्दी सिटी मॅरेथॉन-२०२६'' चे १ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती, महत्व वाढावे, याबाबत पहिल्यांदाच ''
'हेल्दी सिटी मॅरेथॉन' एक फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरात


छत्रपती संभाजीनगर, 26 जानेवारी (हिं.स.)। इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) छत्रपती संभाजीनगरच्या वतीने 'हेल्दी सिटी मॅरेथॉन-२०२६' चे १ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती, महत्व वाढावे, याबाबत पहिल्यांदाच 'हेल्दी सिटी मॅरेथॉन' चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मॅरेथॉनचे आयकॉन डॉ. प्रफुल्ल जटाळे, आयएमए छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर यांनी दिली.

मॅरोथॉन आयोजनाबाबत डॉ. टाकळकर म्हणाले, 'बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांचे चालणे, फिरणे कमी झाले आहे. त्यामुळे आरोग्यावर विविध परिणामझाल्याचे पहायला मिळतात. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. समर्थनगर येथील आयएमए हॉल येथून सकाळी सहा वाजता मॅरेथॉनला सुरुवात होईल. क्रांती चौक, आकाशवाणी चौक ते सिडको चौक आणि परत याच मार्गे आयएमए हॉल असा मार्ग आहे.' 'मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटांतील नागरिकांचा; तसेचकुटुंबांचा सहभाग लक्षात घेऊन चार गटांत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध अंतरांचे हे रन प्रकार असणार आहेत. यामध्ये दोन किलोमीटर व तीन किमी फॅमिली फन रन असणार आहे. त्यासह पाच किमी आणि १० किमी धावणे अशा गटाचा समावेश आहे,' असेही त्यांनी सांगितले.

फिटनेसचा प्रसार, कौटुंबिक कौटुंबिक सहभाग, सामाजिक एकोपा 66 वृद्धिंगत करणे आणि निरोगी शहर ही संकल्पना पुढे नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरातील 'आयएमए'तर्फे आयोजित करण्यात येणारी ही पहिलीच मॅरेथॉन आहे. नोंदणीची प्रक्रिया सुरू असून, वीसपेक्षा अधिक व्यक्तींच्या समूहासाठी नोंदणी शुल्कात विशेष सवलत दिली जाणार आहे. नागरिकांनी अधिकाधिक नोंदणी करावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande