रत्नागिरी : भारतीय ज्ञानपरंपरेतून विकसित भारत साकारूया : डॉ. दिनकर मराठे
रत्नागिरी, 26 जानेवारी, (हिं. स.) : जगाच्या पाठीवर भारत एकमात्र असा देश आहे ज्या देशात भाषा, संस्कृती यांसारख्या बाबतीत विविधता आहे. संस्कृत आणि संस्कृती यांचा मिलाफ असणाऱ्या भारतीय ज्ञानपरंपरेतून विकसित भारत साकारू या, असे प्रतिपादन रत्नागिरी संस्
कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालय उपकेंद्रात प्रजासत्ताक दिन


रत्नागिरी, 26 जानेवारी, (हिं. स.) : जगाच्या पाठीवर भारत एकमात्र असा देश आहे ज्या देशात भाषा, संस्कृती यांसारख्या बाबतीत विविधता आहे. संस्कृत आणि संस्कृती यांचा मिलाफ असणाऱ्या भारतीय ज्ञानपरंपरेतून विकसित भारत साकारू या, असे प्रतिपादन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी डॉ. मराठे म्हणाले की, भारतात विविध संस्कृतींची एक विशेषता आहे. अशीच सर्व संस्कृतींचे मिश्रण असणारी संस्कृतनिष्ठ भारतीय ज्ञानपरंपरा भारताला विकसित करण्यात महत्त्वाचे योगदान करणारी आहे. त्यामुळे विकसित भारतासाठी आपण सर्वांनी संघटित प्रयत्न करू.यावेळी एम ए योगशास्त्र विषयाचे भारत सावंत व सिद्धी कोळेकर या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील विद्यार्थी प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरूप काणे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande