
येवला, 26 जानेवारी (हिं.स.)। देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येवला येथील संपर्क कार्यालयात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी देशाच्या संविधानातील मूल्ये जपण्याचा आणि लोकशाही अधिक बळकट करण्याचा संकल्प केला.
यावेळी राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, वसंत पवार, हुसेन शेख, प्रदीप सोनवणे, शहराध्यक्ष दत्ता निकम, बनकर, , नगरसेविका शेख परवीन बानो, नगरसेवक प्रवीण बनकर, दीपक लोणारी, अमजद शेख, गोटू मांजरे, श्रीकांत वाकचौरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी खासदार समीर भुजबळ यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विषद केले. संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, स्वातंत्र्य आणि न्याय मिळाला असून या मूल्यांचे जतन करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक ऐक्य, बंधुता आणि विकासाभिमुख विचार आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV