
मुंबई, 28 जानेवारी, (हिं.स.)। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने बिग बॉस मराठी सिझन ५ विजेता सुरज चव्हाण भावुक झाला आहे. त्याने सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तो म्हणाला, मित्रांनो माझा देव चोरला आज. मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत…माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं…माझी काळजी घेतली..मला नवीन आयुष्य मिळवून दिलं… अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही…याचं मला लई वाईट वाटतय…लई दुःख होतंय… माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन.
दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली....तुमचाच सूरज
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर