नांदेड मेडिकल फाउंडेशनच्या पुरस्कारांचे रविवारी वितरण
नांदेड, 29 जानेवारी, (हिं.स.)। नांदेड मेडिकल फाउंडेशन या संस्थेतर्फे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रांत तसेच माता बालसंगोपन व कुटुंब कल्याण या क्षेत्रांत विशेष योगदान देणाऱ्या व्यक्ती-संस्थांचा गौरव करण्यात येतो. २०२६ सालचा सेवा पुरस्कार डॉ. नितीन जोश
नांदेड मेडिकल फाउंडेशनच्या पुरस्कारांचे रविवारी वितरण


नांदेड, 29 जानेवारी, (हिं.स.)। नांदेड मेडिकल फाउंडेशन या संस्थेतर्फे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रांत तसेच माता बालसंगोपन व कुटुंब कल्याण या क्षेत्रांत विशेष योगदान देणाऱ्या व्यक्ती-संस्थांचा गौरव करण्यात येतो. २०२६ सालचा सेवा पुरस्कार डॉ. नितीन जोशी आणि हिंगोलीच्या डॉ. मीरा कदम यांना जाहीर झाला असून या पुरस्कारांचे वितरण येत्या रविवारी विशेष कार्यक्रमात केले जाणार आहे.

नांदेडच्या वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध भालेराव परिवाराच्या पुढाकारातून या पुरस्कारांचा उपक्रममागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. यंदाचा प्रमिलाताई भालेराव सेवा पुरस्कार पचनसंस्थांतील विकारांचे तज्ज्ञ व लेखक डॉ. नितीन जोशी यांना तर डॉ. मोहन भालेराव माता बालसंगोपन व कुटुंब कल्याण विशेष पुरस्कार हिंगोली येथील मीरा धनराज कदम यांना सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. पद्माकरराव पंडित यांच्या हस्ते व डॉ.पी.डी. जोशी

पाटोदेकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान केला जाणार आहे.

येत्या रविवारी जुना कौठा भागातील चहलपहल हॉटेलच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. सविता भालेराव, सचिव डॉ. उमेश भालेराव व संयोजक डॉ. सुशांत चौधरी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande