नाशकात शिवसेना गटनेते पदी अजय बोरस्ते यांची एकमताने निवड
Ajay-Boraste
नाशकात शिवसेना गटनेते पदी अजय बोरस्ते यांची एकमताने निवड


नाशिक, 29 जानेवारी (हिं.स.)।

नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षाचे 26 नगरसेवक निवडून आले असून महापालिकेत नंबर 2 चा पक्ष ठरला. आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे गटनेता निवडीची प्रक्रिया संपन्न झाली.

या बैठकीच्या सुरवातीला महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले असल्यामुळे शिवसेना पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शिवसेना सचिव संजयजी मोरे यांच्या आदेशाने व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, जिल्हा निरीक्षक आमदार सुहास कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना गटनेता पदाची निवड करण्यात आली असून गटनेते पदी सर्व नगरसेवकांच्या एकमताने अजय बोरस्ते यांची निवड करण्यात आली. सुवर्णाताई मटाले, दिपक दातिर, रमेश धोंगडे, राहुल दिवे, रंजनाताई बोराडे, समीर कांबळे, किरणताई गामने यांनी अनुमोदन दिले. या प्रसंगी शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande