


शासकीय इतमामात दिला अखेरचा निरोप
पुणे, 29 जानेवारी (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचं काल सकाळी ( 28 जानेवारी) विमान अपघातात निधन झालं. आज सकाळी 9.50 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेस काटेवाडी येथून सुरुवात झाली. काही वेळात त्यांचे पार्थिव बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात 11 वाजता अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. त्यांचे पुत्र पार्थ आणि जय यांनी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुत्र पार्थ आणि जय पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले.
पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी अवघा जनसागर लोटला होता. त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल मंत्री चंद्रशेख बावणकुळे, शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांना पुष्पचक्र अर्पण करून त्यांना निरोप दिला आहे.
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे सर्व पवार कुटुंबीय, मंत्री तसेच विविध पक्षाचे नेते, आमदार, कार्यकर्तेही उपस्थित आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्रिमंडळातील इतर सदस्य बारामतीमध्ये उपस्थित आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु