बजेट सत्रात पंतप्रधानांच्या वक्तव्यांवर जयराम रमेशांची टीका
नवी दिल्ली, 29 जानेवारी (हिं.स.) । बजेट सत्राच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यांवर काँग्रेसचे प्रभारी महासचिव जयराम रमेश यांनी तीव्र टीका केली आहे. “प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला पंतप्रधान देशाला तोच पाखंडी संदेश देतात आणि
मोदी प्रत्येक सत्राच्या सुरुवातीस देशाला आपला तोच पाखंडी संदेश देतात- जयराम रमेश


नवी दिल्ली, 29 जानेवारी (हिं.स.) ।

बजेट सत्राच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यांवर काँग्रेसचे प्रभारी महासचिव जयराम रमेश यांनी तीव्र टीका केली आहे. “प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला पंतप्रधान देशाला तोच पाखंडी संदेश देतात आणि आजचा निषेध हा त्याच मालिकेचा भाग आहे,” असे रमेश यांनी सांगितले.

रमेश यांनी आरोप केला की, राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करत नाहीत. तसेच त्यांच्या अध्यक्षतेखाली अशा कोणत्याही बैठका घेतल्या जात नाहीत. त्यांनी असा दावाही केला की, पंतप्रधान अंतिम क्षणी विधेयके सादर करून आवश्यक विधायी तपासणीशिवाय ती संसदेत मंजूर करून घेतात.

पुढे बोलताना रमेश म्हणाले की, पंतप्रधान संसदेत बसून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत, उलट संसदेला पार्श्वभूमी मानून दोन्ही सभागृहांमध्ये निवडणूक प्रचारासारखी भाषणे देतात.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजेट सत्राच्या सुरुवातीला संसद भवन परिसरात पारंपरिक भाषण करताना सरकारच्या विकासाभिमुख धोरणांवर भर दिला. युरोपियन युनियनसोबतचे मुक्त व्यापार करार महत्वाकांक्षी भारतासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादकांनी नव्या बाजारपेठांमधील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

देश अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या समस्यांवर मात करत असून आता दीर्घकालीन उपाय शोधण्याची वेळ असल्याचे मोदी म्हणाले. “अडथळे निर्माण करण्यापेक्षा उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकार केवळ फाइलांपुरते मर्यादित नसून, कल्याणकारी योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मानवीकेंद्रित दृष्टिकोन ही सरकारची प्राथमिकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. आत्मविश्वासाने भरलेला भारत आज जगासाठी आशेचा किरण ठरत असल्याचे मोदी यांनी शेवटी सांगितले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande