न्यूयॉर्कवर बॉम्ब सायक्लोनचा धोका, पुन्हा जोरदार बर्फवृष्टीचा इशारा
अल्बेनी, 29 जानेवारी (हिं.स.)।न्यूयॉर्क शहर पुन्हा एकदा तीव्र थंडी आणि जोरदार हिमवृष्टीच्या तडाख्यात येण्याची शक्यता आहे. एक शक्तिशाली ‘बॉम्ब सायक्लोन’ हिवाळी वादळ वेगाने शहराच्या दिशेने सरकत असून, शनिवारी रात्रीपासून रविवारी ते धडक देऊ शकते. हवा
न्यूयॉर्कवर बॉम्ब सायक्लोनचा धोका, पुन्हा जोरदार बर्फवृष्टीचा इशारा


अल्बेनी, 29 जानेवारी (हिं.स.)।न्यूयॉर्क शहर पुन्हा एकदा तीव्र थंडी आणि जोरदार हिमवृष्टीच्या तडाख्यात येण्याची शक्यता आहे. एक शक्तिशाली ‘बॉम्ब सायक्लोन’ हिवाळी वादळ वेगाने शहराच्या दिशेने सरकत असून, शनिवारी रात्रीपासून रविवारी ते धडक देऊ शकते.

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, या वादळामुळे ३ इंचांहून अधिक हिमवृष्टी होऊ शकते, तर शहर अजूनही मागील आठवड्यात पडलेल्या एक फूटाहून अधिक बर्फवृष्टीतून सावरत आहे. या वादळामुळे जोरदार वारे आणि तीव्र गारठ्याचा धोका वाढणार असून, तापमान एक अंकी आकड्यांपर्यंत किंवा शून्याखाली घसरण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ हवामान तज्ज्ञ मॅट बेंझ यांनी माध्यमांना सांगितले, “वादळाचा मार्ग काहीही असला तरी रविवारी शहराच्या पूर्व आणि दक्षिण भागात जोरदार वाऱ्यांसह अतिशय थंड दिवस राहण्याची शक्यता आहे.” सध्या तापमान १४ ते २४ अंशांदरम्यान असल्याने वाऱ्यामुळे जाणवणारी थंडी अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे न्यूयॉर्ककरांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान बॉम्ब सायक्लोन, ज्याला बॉम्बोजेनेसिस असेही म्हटले जाते, हा अतिशय वेगाने विकसित होणारा हवामानाचा प्रकार असून तो प्रामुख्याने समुद्रावर तयार होतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande