अमरावतीत 2 कारची टक्कर, चौघांचा मृत्यू, एक गंभीर
अमरावती, 29 जानेवारी (हिं.स.)।भातकुली रोडवरील सायत गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला. बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास सायत येथील मानकर ढाब्यासमोर हा अपघात झाला. भातकुली-दर्यापूर रस्त्यावर एक हायस्पीड आय-टेन आ
अपघात लोगो


अमरावती, 29 जानेवारी (हिं.स.)।भातकुली रोडवरील सायत गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला. बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास सायत येथील मानकर ढाब्यासमोर हा अपघात झाला.

भातकुली-दर्यापूर रस्त्यावर एक हायस्पीड आय-टेन आणि एक होंडा सिटी कारची समोरासमोर टक्कर झाली. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही कारच्या समोरील भागाचा पूर्णतः चुराडा झाला. या अपघातात दोघांचा घटनास्थळी तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भातकुली पोलिसांनी चौघांच्याही अपघाती मृत्यूला दुजोरा दिला आहे.सायत हे गाव भातकुली ते दर्यापूर मार्गावर असून अमरावती पासिंगची कार व अन्य एक कार भरधाव वेगामध्ये समोरासमोर धडकल्या. या भीषण धडकेमध्ये दोन्ही कारमधील चौघे जण मृत्युमुखी पडले. यातील दोघे अन्य करमधील तर दोघे जण अमरावती पासिंगच्या कारमध्ये होते. घटनास्थळी भातकुलीचे ठाणेदार राजूरा जुलवार व त्यांचे पथक पोहोचले असून गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.

मृतांमध्ये मुकुंद काळे (50, यशोदानगरअमरावती), गोपाल राजपुरोहित (28,, रा. भातकुली), प्रेम बिष्णोई (रा. जोधपूर, राजस्थान) व जुनेद यांचा समावेश असल्याचे स जिल्हा सामान्य रुग्णालयीन प्रशासनाने द सांगितले. जुनेद व मुकुंद काळे हे एका कारमध्ये होते तर जुनेद हा कार चालवत असल्याचे समोर आले आहे. जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले दोघांचा घटनास्थळी तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

अपघाताच्या वेळी मुकुंद काळे आणि त्यांचा चालक जुनैद खान हे एकाच कारमध्ये होते. मुकुंद काळे हे साई नगर परिसरात कृष्ण अर्पण नावाचे गॅरेज चालवत होते. दुसऱ्या कारमध्ये असलेले प्रेम आणि गोपाल हे भातकुली येथील बिकानेर मिठाईच्या दुकानात कारागीर म्हणून काम करतहोते. अपघातानंतर, चारही मृतांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, जिथे नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती, ज्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि अपघाताचे कारण तपासण्यास सुरुवात केली आहे.सुसाट वेग हे प्राथमिक कारण असल्याचे मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande