नांदेड:भाजपातील इच्छुक महिला नेत्यांमध्ये हालचाली वाढल्या
नांदेड, 29 जानेवारी (हिं.स.)।नांदेड शहर महानगरपालिकेचेमहापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. मात्र, महापौर निवडीसाठी अधिसूचना विभागीय आयुक्तालयाकडून अद्याप न निघाल्याने सत्तास्थापनेची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे महापौर निवड कधी होणार,
नांदेड:भाजपातील इच्छुक महिला नेत्यांमध्ये हालचाली वाढल्या


नांदेड, 29 जानेवारी (हिं.स.)।नांदेड शहर महानगरपालिकेचेमहापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. मात्र, महापौर निवडीसाठी अधिसूचना विभागीय आयुक्तालयाकडून अद्याप न निघाल्याने सत्तास्थापनेची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे महापौर निवड कधी होणार, याकडे राजकीय व प्रशासकीय वर्तुळासह नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.

महापौर निवडीसाठी विभागीय आयुक्त हे पीठासीन अधिकारी असून, त्यांच्या आदेशानुसार किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले जिल्हाधिकारी ही निवड

प्रक्रिया पार पाडतात. मात्र, विभागीय आयुक्तांकडून अधिसूचना जारी झाल्याशिवाय महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकत नाही. परिणामी, महापालिकेतील पुढील कारभार सध्या प्रतीक्षेच्या स्थितीत आहे.मनपाची मुदत संपल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी घेण्यात आलेल्या निवडणुकांत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. सभागृह नेत्याची निवडही झाली असली, तरी महापौर निवड झाल्याशिवाय स्थायी समिती, विषय समित्या व अन्य कार्यकारिणी स्थापन होऊ शकत नाहीत. त्यामुळे महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेला विलंब होत आहे.

महापौरपद महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने भाजपातील इच्छुक महिला नेत्यांमध्ये हालचाली वाढल्या असून, संभाव्य नावांबाबत महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. महापौरपद कोणाच्या गळ्यात पडते आणि त्यानंतर कोणत्या नगरसेवकाकडे कोणते खाते जाते, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. दरम्यान, अधिसूचनेला होत असलेला विलंब हा केवळ प्रशासकीय बाब की त्यामागे राजकीय गणिते आहेत, अशी चर्चा उघडपणे सुरू झाली आहे. आता छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त अधिसूचना कधी काढतात, यावरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande