
छत्रपती संभाजीनगर, 29 जानेवारी (हिं.स.)।
आज काटेवाडी, बारामती येथे महाराष्ट्राच्या दादानां अखेरचा निरोप देताना मन अत्यंत व्यथित झाले. अशा शब्दात काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
या संदर्भात बोलताना खासदार डॉक्टर कल्याण काळे म्हणाले, स्व. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर जेव्हा-जेव्हा मुंबईला गेलो, तेव्हा दादांची भेट झाली की हमखास आठवण यायची. कारण दादांची आणि साहेबांची भेट नेहमीच एकत्रच होत असे. मी लोकसभेला निवडून आलो तेव्हा दादा म्हणाले होते, “कल्याणराव, तुम्ही केंद्रीय मंत्र्याला पराभूत करून निवडून आलात,” हे सांगताना दादा खूप खूष होते. पुढे ते म्हणाले, “आज खऱ्या अर्थाने विलासरावांचा कार्यकर्ता तू स्वतःला सिद्ध केलेस.”
हे शब्द आजही कानात घुमत आहेत…दादा, तुमचं जाणं अपूर्णतेची मोठी पोकळी निर्माण करून गेलं आहे.
खूप जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली
तुमची आठवण कायम मनात राहील… असेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis