रत्नाकर वाघमारे यांना नांदेड भूषण पुरस्कार जाहीर
नांदेड, 29 जानेवारी (हिं.स.)। नांदेड वाघाळा महापालिकेचे माजी उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांना त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय, विकासात्मक व सामाजिक योगदानाबद्दल पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे वर्ष २०२४ चा मानाचा नांदेड भूषण पुरस्कार जाहीर
रत्नाकर वाघमारे यांना नांदेड भूषण पुरस्कार जाहीर


नांदेड, 29 जानेवारी (हिं.स.)। नांदेड वाघाळा महापालिकेचे माजी उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांना त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय, विकासात्मक व सामाजिक योगदानाबद्दल पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे वर्ष २०२४ चा मानाचा नांदेड भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पुढील महिन्यात शनिवारी दि. २१ फेब्रुवारी रोजी कै. चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान, नांदेड येथे होणाऱ्या 'नरेंद्र देवेंद्र महोत्सव' या दोन दिवसीय काव्य मैफिलीत हजारो रसिकांच्या साक्षीने मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी, संयोजक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी केली आहे.

या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये ११ हजार स्मृतिचिन्ह, मानपत्र व महावस्त्र असे आहे.

नगरपालिकेत लिपिक पदपासून सेवेला सुरुवात करून महापालिकेत उपायुक्त पदापर्यंत मजल मारणारे वाघमारे हे देशातील एकमेव उदाहरण मानले जाते. त्यांनी महापालिकेत १२ वर्षे सहाय्यक आयुक्त व १२ वर्षे उपायुक्त म्हणून काम केले. यशदा मार्फत नागरी व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. चीनचा अभ्यास दौरा करून त्यांनी आधुनिक नागरी संकल्पनांचा अभ्यास केला.

१९९४ ते ९५ मध्ये नांदेड शहरात प्लेगसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना त्यांनी युद्धपातळीवर काम करून ती आटोक्यात आणली. जकात विभागाचे प्रमुख असताना केवळ ८ कोटी उत्पन्न असलेल्या महापालिकेचे स्थानिक संस्था कर (एलबीटी) वाढवून तब्बल १०० कोटींपर्यंत उत्पन्न मिळवून

देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. याच कार्यामुळे महापालिकेला दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपयांचा ग्रँट मिळू लागला.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande