जि. प. निवडणुकीसाठी खुलताबाद येथे मतमोजणी प्रशिक्षण संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 29 जानेवारी, (हिं.स.)। खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषद तीन गटासाठी व पंचायत समितीच्या सहा गणांसाठी पाच फेब्रुवारी रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी कैलास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांचे मतदान
जि. प. निवडणुकीसाठी खुलताबाद येथे मतमोजणी प्रशिक्षण संपन्न


छत्रपती संभाजीनगर, 29 जानेवारी, (हिं.स.)। खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषद तीन गटासाठी व पंचायत समितीच्या सहा गणांसाठी पाच फेब्रुवारी रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी कैलास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांचे मतदान यंत्र तयार करणे व मतमोजणी प्रशिक्षण झाले.

या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार संतोष गुट्टे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेख समीर, गटशिक्षणाधिकारी सचिन वाघ, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विलास केवट, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यांच्या तयारीसह मतदान व मतमोजणी प्रक्रियेबाबत निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये मतदान यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी, मॉक पोल, उमेदवारांची नावे भरणे, सील प्रक्रिया; तसेच मतमोजणीच्या वेळी निकाल काढण्याची व नोंदणी करण्याची कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रिया त्रुटी विरहित मार्गदर्शक व विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात प्रशिक्षण जिल्हास्तरावरील मास्टर ट्रेनर यांनी दिले.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुचिता शिंदे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार संतोष गुट्टे यांनी या वेळी मार्गदर्शन केले. दुसरे व तिसरे प्रशिक्षण ३१ जानेवारी व २ फेब्रुवारी रोजी कैलास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे होणार असल्याचे कळविण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande