टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : १० व्या फेरीत गुकेश विजयी, एरिगसी पराभूत
अँमस्टरडॅम, २९ जानेवारी (हिं.स.)टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या १० व्या फेरीत भारतीय बुद्धिबळपटूंनी संमिश्र कामगिरी केली. विश्वविजेता डी. गुकेशने विजयासाठी शानदार पुनरागमन केले, तर भारताचा अव्वल दर्जाचा बुद्धिबळपटू अर्जुन एरिगसीला जर्मनीच्
डी गुकेश


अँमस्टरडॅम, २९ जानेवारी (हिं.स.)टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या १० व्या फेरीत भारतीय बुद्धिबळपटूंनी संमिश्र कामगिरी केली. विश्वविजेता डी. गुकेशने विजयासाठी शानदार पुनरागमन केले, तर भारताचा अव्वल दर्जाचा बुद्धिबळपटू अर्जुन एरिगसीला जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरकडून आणखी एक पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, आर. प्रज्ञानंदने अमेरिकेच्या हान्स मोके निमनविरुद्ध बरोबरी साधली.

काळ्या मोहऱ्यांसह खेळताना, डी. गुकेशने तुर्कीचा बुद्धिबळपटू यागिज कान एर्डोगमसविरुद्ध उत्कृष्ट कौशल्य दाखवले. या विजयाने गुकेशचा स्पर्धेतील पाचवा विजय झाला आणि त्याचे आता १० सामन्यांतून पाच गुण झाले आहेत. पण विश्वविजेत्या या बुद्धिबळपटूला विजेतेपदाच्या शर्यतीत राहण्यासाठी उर्वरित तीन फेऱ्यांमध्ये अपवादात्मक कामगिरी करावी लागेल.

दुसरीकडे, अर्जुन एरिगसीची निराशाजनक कामगरी कायम आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत अव्वल स्थानासाठी शर्यतीत असलेल्या एरिगसीने मधल्या गेममध्ये आपला वेग गमावला. कीमरने संधीचा फायदा घेतला आणि एरिगसीला सावरण्याची संधी दिली नाही. १० फेऱ्यांनंतर, एरिगसीचे फक्त चार गुण आहेत, तो गुणतालिकेत तळाशी घसरला.

आर. प्रज्ञानंदाने फ्रेंच डिफेन्समध्ये खेळताना हान्स मोके निमनविरुद्ध बरोबरी स्वीकारली. फ्रेंच डिफेन्समधील प्रज्ञानंदाच्या रुबिनस्टाईन व्हेरिएशनने निश्चितच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण सामना फारसा गुंतागुंतीचा झाला नाही. नियमित मोहऱ्यांच्या देवाणघेवाणीनंतर, सामना पूर्णपणे संतुलित रुक आणि प्यादाच्या एंडगेममध्ये संपला. हा प्रयोग आगामी कॅंडिडेट्स स्पर्धेपूर्वी प्रज्ञानंदाच्या नवीन तयारीचे लक्ष म्हणून पाहिले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande