योग्य सन्मान मिळत नसल्याने 2019 मध्ये निवृत्तीचा निर्णय - युवराज सिंग
नवी दिल्ली, 29 जानेवारी (हिं.स.)माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंगने खुलासा केला आहे की, जेव्हा त्याला कर्करोगाचे निदान झाले तेव्हा त्याच्या डॉक्टरांनी त्याला सांगितले की त्याच्याकडे तीन ते सहा महिने शिल्लक आहेत. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताच्
युवराज सिंग


नवी दिल्ली, 29 जानेवारी (हिं.स.)माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंगने खुलासा केला आहे की, जेव्हा त्याला कर्करोगाचे निदान झाले तेव्हा त्याच्या डॉक्टरांनी त्याला सांगितले की त्याच्याकडे तीन ते सहा महिने शिल्लक आहेत. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताच्या विजयात युवराजने महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून घोषित करण्यात आले होते. विश्वचषकानंतर, युवराजने कर्करोगावर उपचार घेतले आणि पूर्णपणे बरा झाल्यानंतर तो मैदानात परतला होता.

युवराजने असेही म्हटले की, त्याला वाटले की त्याला तो आदर मिळत नाही, म्हणूनच त्याने जून २०१९ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. युवराजने २०१७ पासून कोणत्याही स्वरूपात भारताचे प्रतिनिधित्व केले नव्हते आणि २०१९ मध्ये त्याच्या कारकिर्दीला निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्याने कबूल केले की क्रिकेटमधून त्याला मिळणारा आनंद हळूहळू कमी होत गेला. मला माझ्या खेळाचा आनंद मिळत नव्हता, युवी म्हणाला. मला वाटत होतं की जर मला क्रिकेट खेळायला आवडत नसेल तर मी का खेळत आहे? मला पाठिंबा मिळत नव्हता. मला आदर मिळत नव्हता, आणि मला वाटत होतं की जर मला ते मिळत नसेल तर मी ते का करावे? मी अशा गोष्टीत का गुंतलो आहे जी मला आवडत नाही? मला खेळण्याची गरज का आहे? मला काय सिद्ध करायचे आहे? मी मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या काहीही करू शकत नाही आणि त्याचा माझ्यावर परिणाम होत होता. ज्या दिवशी मी खेळणे थांबवले, त्या दिवशी मी पुन्हा पहिल्या टप्प्यावर आलो.

टेनिस स्टार सानिया मिर्झाशी झालेल्या संभाषणात युवराज म्हणाला, मी एका वर्षापासून माझ्या शरीरात बदल जाणवत होते. मला सतत फ्रॅक्चरचा त्रास होत होता आणि मला ट्यूमर असल्याने अन्न पचत नव्हते. त्यावेळी मला ट्यूमर आहे हे माहित नव्हते. मी फक्त क्रिकेटला प्राधान्य दिले कारण मी माझ्या कारकिर्दीच्या शिखरावर होतो. मी एकमेव खेळाडू आहे जो त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम टप्प्यावर असूनही, काहीतरी झुंजत असल्याने कामगिरी करू शकला नाही.

युवराज म्हणाला, मला त्यावेळी कर्करोग आहे हे माहित नव्हते. मी भाग्यवान होतो की मी क्रिकेटला प्राधान्य देऊ शकलो. विश्वचषक भारतात होणार होता आणि मला सर्वकाही बाजूला ठेवून क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे लागले. पण मी माझ्या शरीराशी संघर्ष करत होतो. जेव्हा आम्ही विश्वचषक जिंकला आणि हे सर्व सुरू झाले, तेव्हा मला कर्करोगवरा उपचार घ्यावे लागले. वर्षाच्या अखेरीस मला उपचारासाठी जायचे होते, पण मी आधीच जायला हवे होते कारण डॉक्टरांनी मला सांगितले होते की माझ्याकडे फक्त तीन ते सहा महिने शिल्लक आहेत. एकतर क्रिकेट खेळा आणि मैदानावर मरून जा, किंवा उपचार घ्या.

माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू पुढे म्हणाला, सौरव गांगुली निवृत्त झाला होता आणि माझ्यासाठी कसोटी क्रिकेट खेळणे खूप महत्वाचे होते. मला नियमितपणे कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. नंतर मी उपचारांसाठी गेलो. तो एक कठीण प्रवास होता ज्याचे मी शब्दात वर्णनही करू शकत नाही. पण मला पुन्हा भारतासाठी खेळण्याची प्रेरणा मिळाली कारण प्रत्येकजण म्हणत होता की मी ते करू शकणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande