सोलापूर : गणेश वानकर यांचे शक्तिप्रदर्शन
सोलापूर, 05 जानेवारी (हिं.स.)। केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे झाली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत. सोलापूर महानगरपालिकेतसुद्धा भाजपाची सत्ता ये
सोलापूर : गणेश वानकर यांचे शक्तिप्रदर्शन


सोलापूर, 05 जानेवारी (हिं.स.)। केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे झाली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत. सोलापूर महानगरपालिकेतसुद्धा भाजपाची सत्ता येणार असून प्रभाग क्रमांक ६ मध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हजारोंच्या साक्षीने वानकर परिवाराला दिला. लाडक्या बहिणींच्या गर्दीने सभामंडप ओसंडून वाहत होता.सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ६ मधील भाजपच्या उमेदवार सोनाली गायकवाड, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि गणेश वानकर यांच्या निवडणुक प्रचाराचा सोलापुरातील पहिला शुभारंभ रविवारी सकाळी देगाव ग्रामपंचायत येथील जागृत मारुती मंदिरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यानंतर झालेल्या विराट सभेत पालकमंत्री गोरे यांनी प्रभागातील नागरिकांना आश्वासित केले. प्रभागाच्या विकासाची काळजी आपली असून आपण सर्व उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी कामाला लागा,असे आवाहनही पालकमंत्री गोरे यांनी यावेळी बोलताना केले.याप्रसंगी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण,भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मनिष देशमुख, ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर,प्रचार प्रमुख हेमंत पिंगळे उपस्थित होते.पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सभेच्या ठिकाणी आगमन होताच जय श्रीराम,वंदे मातरम ,च्या घोषणांनाही परिसर दणाणून गेला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande