
लातूर, 05 जानेवारी (हिं.स.)।
लातूर महापालिका 2026 निवडणुकीत काँग्रेस–वंचितचा 90 टक्के स्ट्राईक रेट राहील; आमदार अमित देशमुख यांचे प्रतिपादन.
लातूर शहर महानगरपालिकेच्या 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचा स्ट्राईक रेट तब्बल 90 टक्के राहिल असा दावा आमदार अमित देशमुख यांनी केला आहे.
लातूर शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित काँग्रेस–वंचितच्या ऐतिहासिक संयुक्त सभेत ते बोलत होते.
आमदार अमित देशमुख म्हणाले की, लातूर शहरातील जनतेने सातत्याने पुरोगामी विचारांना पाठिंबा दिला असून, काँग्रेस आणि वंचितची आघाडी ही सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करणारी आघाडी आहे. आगामी महापालिका निवडणुकीत ही एकजूट अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. काँग्रेस–वंचित आघाडीच्या एकजुटीमुळे शहराच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis