पाच गुंठे आतील बांधकामांनाच आता मोफा कायद्याच्या तरतुदी लागू होणार
पुणे, 05 जानेवारी (हिं.स.)। आठ सदनिका किंवा पाच हजार चौरस फुटांच्या (पाच गुंठे) आतील बांधकामांनाच आता महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट (मोफा) कायद्याच्या तरतुदी लागू होणार आहेत. तसा बदल राज्य शासनाकडून ‘मोफा’ कायद्यात करण्यात आला आहे.त्यामुळे पाच हजा
पाच गुंठे आतील बांधकामांनाच आता मोफा कायद्याच्या तरतुदी लागू होणार


पुणे, 05 जानेवारी (हिं.स.)। आठ सदनिका किंवा पाच हजार चौरस फुटांच्या (पाच गुंठे) आतील बांधकामांनाच आता महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट (मोफा) कायद्याच्या तरतुदी लागू होणार आहेत. तसा बदल राज्य शासनाकडून ‘मोफा’ कायद्यात करण्यात आला आहे.त्यामुळे पाच हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या पुढील बांधकामांना आता एकच म्हणजे ‘महारेरा’ कायदा लागू राहणार आहे. कायद्यात सुटसुटीतपणा आल्यामुळे रहिवाशांबरोबरच बांधकाम व्यावसायिकांनाही याचा फायदा होणार आहे.राज्यात यापूर्वी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट (मोफा) आणि महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ॲक्ट (महारेरा) असे दोन्ही कायदे लागू होते. राज्यात २०१६ मध्ये ‘महारेरा’ कायदा लागू करण्यात आला. परंतु या कायद्यामध्ये पाच हजार चौरस फुटांच्या आतील जागेवरील बांधकामांना या कायद्यातून वगळण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande