
नांदेड, 05 जानेवारी (हिं.स.)नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना केले.नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रभारी असलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांनी शहरातील विविध भागांमध्ये मतदारांशी थेट संवाद साधला आहे एवढेच नव्हे तर हनुमान गड येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत त्यांनी मतदारांना आवाहन केले आहे
नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक 4 मधील भाजपचे उमेदवार श्री. दयानंद वाघमारे, सौ.सरिता बिरकले, सौ. शैलजा स्वामी, श्री.प्रशांत तिडके पाटील यांच्या प्रचारार्थ हनुमान गड येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेस संबोधित केले. खा.डाॅ. अजित गोपछडे, आमदार श्रीजया चव्हाण व स्थानिक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis