नांदेड : मंत्री बावनकुळेंनी घेतला भाजपा उमेदवारांचा परिचय आणि दिल्या सूचना
नांदेड, 05 जानेवारी (हिं.स.)। नांदेड वाघाळा महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली पाहिजे या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री तथा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जन
नांदेड


नांदेड


नांदेड, 05 जानेवारी (हिं.स.)।

नांदेड वाघाळा महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली पाहिजे या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री तथा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना केल्या.

नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुक संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांचे परिचय आणि मार्गदर्शन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

यावेळी उमेदवारांशी थेट चर्चा केली त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. थेट मतदारांशी संपर्क करावा भारतीय जनता पक्षाने केंद्र आणि राज्यात केलेले काम आवर्जून मतदारांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी

मंत्री पंकजाताई मुंडे, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण,संघटनमंत्री संजय कौडगे, माजी मंत्री डी.पी. सावंत, आमदार श्रिजयाताई चव्हाण, माजी आमदार अमरनाथ राजूरकर तसेच जिल्ह्यातील भाजपा चे प्रमुख पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande