परभणी : भीषण अपघातात एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
परभणी, 05 जानेवारी (हिं.स.)। परभणी ते गंगाखेड या महामार्गावर ब्राह्मणगाव फाटा येथे आज सोमवार रोजी सकाळी 09.00 चे सुमारास ट्रक क्र, KA32AA1184 व‌ मोटर सायकल क्र MH22AG0242 यांचा समोरासमोर अपघात झाल्याने अपघातात मोटार सायकल चालक आतिश अनिल जाधव (वय 2
ट्रक व मोटरसायकलच्या समोर समोर धडकेत एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी; ब्राह्मणगाव फाटा जवळील दुर्दैवी घटना


परभणी, 05 जानेवारी (हिं.स.)।

परभणी ते गंगाखेड या महामार्गावर ब्राह्मणगाव फाटा येथे आज सोमवार रोजी सकाळी 09.00 चे सुमारास ट्रक क्र, KA32AA1184 व‌ मोटर सायकल क्र MH22AG0242 यांचा समोरासमोर अपघात झाल्याने अपघातात मोटार सायकल चालक आतिश अनिल जाधव (वय 25 वर्ष) हे जागी मृत्युमुखी पडले तर मोटरसायकल वर पाठीमागे बसलेले कृष्णा अनिल जाधव (वय 18 वर्ष ) हे गंभीर जखमी झाले.

या घटनेबाबत माहिती मिळताच तात्काळ महामार्ग पोलीस केंद्र परभणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गुणवंतराव शिनगारे, पोलीस जमादार संजय अशोकराव पुरी व श्याम एकनाथराव काळे तसेच पोलीस अमलदार उत्तरेश्वर मुंजाबा घुगे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन अपघातातील जखमी व्यक्तीस एक छोटा हत्ती रिक्षा थांबवून त्यांना तात्काळ दवाखान्यात उपचारार्थ पाठवून दिले.

अपघातातील ट्रक व मोटार सायकल रस्त्याचे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान तेथील जमलेले लोकांना समजावून सांगून रस्त्याच्या बाजूला करून रस्ता सुरक्षा अभियान 2026 अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande