सोलापूर; रात्री १० नंतर विनाकारण फिरण्याची मनाई
सोलापूर, 05 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती, शास्त्री नगर, नई जिंदगी अशा ३० अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. याशिवाय र
Cp


सोलापूर, 05 जानेवारी (हिं.स.)। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती, शास्त्री नगर, नई जिंदगी अशा ३० अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. याशिवाय रात्री १० नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवरही पोलिसांनी निर्बंध घातले आहेत.महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून शिंदे व सरवदे कुटुंबातील वाद विकोपाला गेला. त्यात बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला. याशिवाय शुक्रवारी भवानी पेठ परिसरात देखील गोंधळ झाला होता. निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने अनेकजण नाराज असून अनेकांना पक्षाने डावल्याने अपक्ष उभारावे लागले आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान दोन गटात वाद होऊ शकतात.या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी रात्रगस्त प्रभावीपणे करावी, रात्री दहानंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करावी, अतिसंवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार शहरातील विजापूर नाका, एमआयडीसी, सदर बझार, जेलरोड, जोडभावी पेठ, सलगर वस्ती, फौजदार चावडी या सात पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंमलबजावणी सुरु झाली आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande