
डोंबिवली, 07 जानेवारी (हिं.स.)।कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष स्वतंत्र लढवत आहे. पक्षाने निवडणुकीसाठी एकूण ४० उमेदवार उतरविले आहेत. जिल्हाध्यक्ष महेश तपासे यांनी उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकार व कार्यकर्ते उपस्थित होते.
पूर्वेकडील प्रभाग क्रमांक 26 ड मधून शरदचंद्र पवार राष्ट्रवादि काँग्रेस पार्टी चे डोंबिवली उपशहरअध्यक्ष मुत्तूकनन नाडर निवडणूक लढवीत आहेत. तर प्रभाग क्रमांक २२ - ड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरद चंद्र पवार पक्षचे अधिकृत उमेदवार रविकिरण राजाराम बनसोडे हे निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान अत्रिनंदन सोसायटी, नगर, महात्मा फुले रोड, डोंबिवली (पश्चिम) येथील जनसंपर्क कार्यालयाचे करतांना यावेळी महेश तपासे यांनी सांगितले की, पक्षाने जनतेसाठी लढणारे उमेदवार म्हणून या उमेदवारांना निवड झाली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी आणि जनतेच्या सदैव पाठीशी राहणारे असे हे उमेदवार आहेत असे गौरोदगार काढले.
यावेळी रविकिरण राजाराम बनसोडे म्हणाले, गेली दोन दशके तळागाळातील लोकांच्या सेवेसाठी काम करत आहेत. डोंबिवली शहर कार्याध्यक्ष म्हणून काम करतांना प्रभागातील मूलभूत प्रश्नांवर सतत निदर्शने आंदोलन व सरकारकडे पाठपुरावा केला. समाजकार्यात मार्गदर्शन व भिमोत्सवसारखे इव्हेंट,
समाज प्रबोधनपर कार्यक्रम, महिलांच्या अधिकारासाठी कार्यशाळा चर्चासत्र, परिषद तसेच समाजातील उपेक्षित आणि गरीब घटकांसाठी आरोग्य शिक्षण आणि अन्य प्रकारची मदत करण्यात नेहमीच पुढाकार आणि सर्व प्रकारचे आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर आयोजित केली आहेत. यावेळी कल्पना किरतकर, मनोज किरतकर, रिया बनसोडे, प्रवीण वाघमारे, प्रणिता शहा, संजय लोंढे, सचिन रेवगुडे, राहुल मोरे, रवी मोरे, महेश स्वामी, मंगेश जाधव, आदी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi