मुखेडमध्ये सोमवारी नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या उपस्थितीत पहिली बैठक, भाजपाच्या गटनेतेपदी नागनाथ लोखंडे
नांदेड, 07 जानेवारी (हिं.स.)।नवनिर्वाचित नगराध्यक्षा विजया देबडवार यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नपचे नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक दि. १२ जानेवारी रोजी नप सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीत स्वीकृत सदस्य व उप
उपनगराध्यक्षासह स्वीकृत सदस्यपदासाठी मोर्चेबांधणी


नांदेड, 07 जानेवारी (हिं.स.)।नवनिर्वाचित नगराध्यक्षा विजया देबडवार यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नपचे नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक दि. १२ जानेवारी रोजी नप सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीत स्वीकृत सदस्य व उपाध्यक्षाची निवड करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.नगरपरिषद भाजपा गटनेतेपदी भाजपाचे शहर मंडळाध्यक्ष नागनाथ लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे. स्वीकृत सदस्य आणि उपाध्यक्ष पदावर वर्णी लागावी, यासाठी आ. डॉ. तुषार राठोड, माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड यांच्याकडे इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आ. डॉ. तुषार राठोड काय धक्कातंत्र अवलंबणार ऐनवेळी कुणाची नियुक्ती करणार याकडे लक्ष लागले आहे.

मुखेडच्या नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे सौ विजया देबडवार विजयी झाल्या तर दुसरीकडे २० पैकी १४ सदस्य भाजपाचे विजयी झाले आहेत. त्यामुळे अध्यक्ष एका पक्षाचा आणिबहुमत दुसऱ्या पक्षाचे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिवसेना शिंदे गटाची राजकीय सुत्रे मुंबई येथून एक माजी अधिकारी हलवत आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे स्वीकृत सदस्य कोण होणार? याबाबतचा निर्णय मुंबई येथून होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे ६ सदस्य विजयी झाले आहेत. स्वीकृत सदस्यासाठी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.

भाजपाचे सभागृहात पूर्ण बहुमत असल्याने भाजपाचे दोन का एक स्वीकृत सदस्य होणार?, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपा उपाध्यक्ष पदाच्या निवडीबाबतचे सर्व निर्णय आ. डॉ. तुषार राठोड व गंगाधर राठोड घेणार आहेत. आगामी राजकीय व्यूहरचनातून ह्या निवडी केले जाण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपदासाठी राजकुमार बामणे, नीलावती पाटील, रेखा लोहबंदे, अंजली रोडगे, मुस्तफा शेख, जयश्री गज्जलवाड अंजली जाजू यांची नावे चर्चेत आहेत. सर्वाधिक अनुभवी म्हणून राजकुमार बामणे यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच स्वीकृत सदस्यपदासाठी माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, गौतम काळे, राम पत्तेवार, चंद्रकांत गरुडकर, वसंत संबुटवाड, जगदीश बियाणी आदींची नावे चर्चेत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, धोंडू सावकार देबडवार, डॉ. अतुल देबडवार यांच्यासह शिवाजी गेडेवाड, पवन शिंगटवाड, श्याम एमेकर, शंकर उमाटे, बालाजी बाबळे यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, नगराध्यक्षा सौ विजया देबडवार या ज्येष्ठ महिला असून त्यांना सभागृहात मदत म्हणून देबडवार कुटुंबातील एक सदस्याची स्वीकृत सदस्य म्हणून निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande