पनवेल - अपक्ष उमेदवार मल्लिनाथ गायकवाड यांनी शपथपत्राद्वारे भ्रष्टाचार न करण्याची दिली ग्वाही
रायगड, 09 जानेवारी (हिं.स.)। पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ (ड) मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले मल्लिनाथ शंकरराव गायकवाड यांनी निवडून आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नसल्याची ठाम ग्वाही दिली आहे. यासाठी त्य
Gaikwad pledged not to commit corruption through an affidavit of Rs. 500.


रायगड, 09 जानेवारी (हिं.स.)। पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ (ड) मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले मल्लिनाथ शंकरराव गायकवाड यांनी निवडून आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नसल्याची ठाम ग्वाही दिली आहे. यासाठी त्यांनी ५०० रुपयांच्या शपथपत्राद्वारे आपली भूमिका जाहीर करत स्वच्छ आणि पारदर्शक राजकारणाचा संकल्प व्यक्त केला आहे.

प्रभाग १६ (ड) मधील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर बोलताना गायकवाड यांनी सिडको प्रशासनाच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. आपल्या जाहीर संकल्पनाम्यात त्यांनी गृहनिर्माण, पुनर्विकास आणि नागरिकांच्या मालकी हक्काशी संबंधित मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. सिडकोच्या परवानगीने उभारण्यात आलेल्या बहुसदनिका व गाळे असलेल्या इमारतींना कोणताही दंड न आकारता नियमित करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. नागरिकांची कोणतीही चूक नसताना हा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित ठेवण्यात आल्याने हजारो कुटुंबे अडचणीत सापडली असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच गेल्या सात ते आठ वर्षांपासून बंद असलेल्या बंगलो टाईप भूखंडांवरील सर्व परवानग्या तात्काळ सुरू करण्यासाठी सिडको प्रशासनाला भाग पाडणार असल्याचा दावा त्यांनी केला. सोसायटी सभासद यादी अद्ययावत करताना कोणतेही हस्तांतरण शुल्क आकारू नये, हीही त्यांची महत्त्वाची मागणी आहे.

प्रभागातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव एफएसआयसह परवानगी मिळवून देण्याचे आश्वासन देत, सिडको व पनवेल महानगरपालिकेचे स्पष्ट, पारदर्शक आणि एकसंध पुनर्विकास धोरण निश्चित करण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande