अकोला येथे विद्यार्थी रॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृती
अकोला, 08 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अनुषंगाने अकोला महानगरपालिका क्षेत्रात मतदान जनजागृती करण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांच्या मार्गदर्शन
अकोला येथे विद्यार्थी रॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृती


अकोला, 08 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अनुषंगाने अकोला महानगरपालिका क्षेत्रात मतदान जनजागृती करण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून या अनुषंगाने आज दि. 8 जानेवारी 2026 रोजी अकोला महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांव्दारे मतदान जनजागृती रॅली, काढून शाळापरिसरांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली आहे. या रॅलींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील सहभाग आणि जबाबदार मतदाराची भूमिका याबाबत जागृत करण्यात येत आहे.

आजच्या जनजागृती रॅलीमध्ये महानगरपालिका गुजराती शाळा क्रमांक 1, महानगरपालिका सिंधी हिंदी शाळा क्रमांक 1, आर्य समाज मंदिर, डीएव्ही कॉन्व्हेंट अकोला तसेच स्वावलंबी विद्यालय अशा 5 शाळांचा समावेश होता. सदर रॅलीची सुरूवात मनपा शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी मतदार जनजागृती हरिश्चंद्र इटकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. यावेळी नोडल अधिकारी नईम फरास, मुख्याध्यापक गजेंद्र ढवळे, मुख्याध्यापक युवराज पठाडे सर, हरीश शर्मा सर, राहुल ठाकूर, विपुल राणा, यांचे सह सर्व शाळांचे शिक्षक तसेच पालक वर्गाची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande