मोलखेडा आणि पिंपळवाडी येथील पुतळा उभारण्यासाठी चबुतरा आराखडा बांधकामाचे भूमिपूजन
छत्रपती संभाजीनगर, 09 जानेवारी (हिं.स.)। सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा तसेच पिंपळवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून मान्यता मिळवून दिली होती. या दो
मोलखेडा आणि पिंपळवाडी येथील पुतळा उभारण्यासाठी चबुतरा आराखडा बांधकामाचे भूमिपूजन


छत्रपती संभाजीनगर, 09 जानेवारी (हिं.स.)। सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा तसेच पिंपळवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून मान्यता मिळवून दिली होती.

या दोन्ही प्रस्तावास शासनाने मान्यता दिली. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत मागणी होती. मान्यता मिळाल्यानंतर या दोन्ही महापुरुषांच्या पुतळा उभारण्यासाठी चबुतरा आराखडा बांधकामाचे भूमिपूजन शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी केले.

मोलखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा तर पिंपळवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत असल्याने येथील गावकऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी मान्यता मिळवून दिली व प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्या बद्दल गावकऱ्यांनी आमदार सत्तार यांचा सत्कार केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande