
छत्रपती संभाजीनगर, 09 जानेवारी (हिं.स.)।
शिवसेना आमदार अब्दुल सत्तार विकास कामांच्या भूमिपूजन निमित्त सोयगाव दौऱ्यावर असतांना त्यांना एक भेट मिळाली. डाभा येथील एक दिव्यांग मुलगा चेतन लक्ष्मण गायकवाड यांनी शिवसेना आमदार अब्दुल सत्तार व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे स्केच बनवून ही प्रतिमा भेट दिली.
शिवसेना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले,त्याची सुबक व अप्रतिम कला पाहून मन भारावून गेले. चेतन हा अत्यंत हुशार विद्यार्थी आहे. त्याच्या या अफलातून कलाकृती बद्दल गौरव करुन स्केचच्या माध्यमातून त्याने माझ्या बद्दल तसेच एकनाथराव शिंदे यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या प्रेमा बद्दल आमदार सत्तार यांनी आभार मानले. आणि त्याच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis