टीडीएस तरतुदीचे पालन न केल्याप्रकरणी कापूस व्यापार करणाऱ्या कंपनीची चौकशी
छत्रपती संभाजीनगर, 09 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील आयकर कार्यालय, टीडीएस मार्फत टीडीएस तरतुदीचे पालन न केल्याप्रकरणी एका कापसाचा व्यापार करणाऱ्या कंपनीची चौकशी केली. या कंपनीने २० कोटी रुपयांच्या दिलेल्या व्याजावर कोणताही कर कपात के
टीडीएस तरतुदीचे पालन न केल्याप्रकरणी कापूस व्यापार करणाऱ्या कंपनीची चौकशी


छत्रपती संभाजीनगर, 09 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील आयकर कार्यालय, टीडीएस मार्फत टीडीएस तरतुदीचे पालन न केल्याप्रकरणी एका कापसाचा व्यापार करणाऱ्या कंपनीची चौकशी केली. या कंपनीने २० कोटी रुपयांच्या दिलेल्या व्याजावर कोणताही कर कपात केला नाही तसेच अन्य व्यवहारांमध्ये कापलेले ७१ लाख रुपयांचे टीडीएस सरकार खात्यात जमा केले नाही,असा आरोप आहे, अशी माहिती आयकर अधिकारी (टीडीएस) राहुल मोरे यांनी दिली आहे.

येथील कापसाचा व्यापार करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात सर्वे करुन दिवसभर विविध कागदपत्रांची तपासणी केली. त्यात कंपनीने दिलेल्या व्याजावर लागू असलेला दहा टक्के टीडीएस कापला नाही आणि इतर व्यवहारांवर कापलेल्या टीडीएस केंद्र सरकारच्या खात्यात जमा केला नाही, या कारणास्तव आयकर विभागाच्या टीडीएस अधिकाऱ्यांनी कंपनीची सखोल चौकशी केली. आयकर कायदा १९६१ च्या कलम १९ ए च्या तरतुदीनुसार, कोणत्याही कंपनीसाठी व्याज देताना दहा टक्के टीडीएस कापणे बंधनकारक आहे. तथापि, कंपनीने सुमारे वीस कोटी रुपयांच्या दिलेल्या व्याजावर कोणताही कर कापला नाही. शिवाय, कंपनीने इतर व्यवहारांवर कापलेले सुमारे ७१ लाख रुपयांचे टीडीएस सरकारी खात्यात जमा केले नाही,असाही आरोप आहे.तपासणी दरम्यान व्याजासह ही रक्कम वसूल करण्यात आली आहे.

संबंधित सर्वांनी आयकर कायदा,१९६१ च्या सर्व टीडीएस तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन आयकर विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande