अमेरिकेच्या कारवाईत शहीद झालेल्या व्हेनेझुएलाच्या सैनिकांना भावनिक निरोप
काराकास, 08 जानेवारी (हिं.स.)।वेनेझुएलाच्या लष्कराने बुधवारी राजधानी काराकासमध्ये अलीकडे झालेल्या अमेरिकन लष्करी कारवाईत शहीद झालेल्या सैनिकांवर लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीदांच्या सन्मानार्थ कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रि
अमेरिकेच्या कारवाईत शहीद झालेल्या व्हेनेझुएलाच्या सैनिकांना भावनिक निरोप


काराकास, 08 जानेवारी (हिं.स.)।वेनेझुएलाच्या लष्कराने बुधवारी राजधानी काराकासमध्ये अलीकडे झालेल्या अमेरिकन लष्करी कारवाईत शहीद झालेल्या सैनिकांवर लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीदांच्या सन्मानार्थ कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिग्ज यांनी सात दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.

वेनेझुएलाच्या लष्कराने शहीद झालेल्या सैनिकांसाठी भावपूर्ण अंत्यसंस्कार आयोजित केले. यावेळी सैनिकांच्या वाद्यवृंदाच्या करुण धुनांच्या पार्श्वभूमीवर शहीद जवानांचे मृतदेह ठेवलेले ताबूत काठ्यांवरून नेताना त्यावर वेनेझुएलाचा राष्ट्रीय ध्वज अंथरलेला दिसत होता. कुटुंबीय आणि सहकारी सैनिक मृतदेहांच्या मागे चालत त्यांना अखेरचा निरोप देत होते. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ताबूत जमिनीत सुपूर्द करताना तोफेची सलामीही देण्यात आली.

वेनेझुएलाच्या लष्कराने सांगितले की, या कारवाईत किमान 24 सुरक्षा अधिकारी शहीद झाले असून त्यामध्ये अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, क्युबानेही पुष्टी केली आहे की वेनेझुएलामध्ये तैनात असलेले 32 क्युबन लष्करी आणि पोलीस कर्मचारी या घटनेत ठार झाले. या पार्श्वभूमीवर क्युबामध्ये दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला.

शहीदांच्या सन्मानार्थ कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिग्ज यांनी सात दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. त्यांनी सांगितले की, देश या वीरांचे बलिदान कधीही विसरणार नाही आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. वेनेझुएलाचे अ‍ॅटर्नी जनरल तारेक विल्यम साब यांनी म्हटले की, या मृत्यूंची चौकशी युद्धगुन्ह्यांच्या चौकटीत केली जाईल आणि दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, अमेरिकेने मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अमली पदार्थविरोधी आरोपांखाली खटला चालवण्यासाठी ताब्यात घेतले असून मादुरो यांनी अमेरिकन न्यायालयात आपण दोषी नसल्याचा दावा केला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या कारवाईमुळे तीव्र वाद आणि टीका झाली आहे. अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आणि नागरिकांच्या जीवितहानीबाबत चिंता व्यक्त केली आहे, तर अमेरिकेने ही कारवाई लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी उचललेले पाऊल असल्याचे सांगितले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande