छत्रपती संभाजीनगर-भाजीपाला नेणाऱ्या पिकअपची ट्रॅक्टरला धडक
छत्रपती संभाजीनगर, 08 जानेवारी (हिं.स.)भाजीपाला नेणाऱ्या पिकअपची ट्रॅक्टरला धडक बसल्यामुळे फुलंब्री शहरामधील चालक गंभीर जखमी झाला आहे. फुलंब्री- छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील समृद्धी महामार्गाजवळ घटना घडली आहे फुलंब्री ते छत्रपती संभा
छत्रपती संभाजीनगर-भाजीपाला नेणाऱ्या पिकअपची ट्रॅक्टरला धडक


छत्रपती संभाजीनगर, 08 जानेवारी (हिं.स.)भाजीपाला नेणाऱ्या पिकअपची ट्रॅक्टरला धडक बसल्यामुळे फुलंब्री शहरामधील चालक गंभीर जखमी झाला आहे.

फुलंब्री- छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील समृद्धी महामार्गाजवळ घटना घडली आहे

फुलंब्री ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील समृद्धी महामार्गाजवळ भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला मागून जोरात धडक दिली. या अपघातात राजू फकीर खान पठाण (४६) आणि निसार पठाण (रा. फुलंब्री) हे बापलेक जखमी झाले. वडिल गंभीर जखमी झाले असून मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे.

टेम्पो (एमएच ०४ एफयू ४८८२) फुलंब्री येथून छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मंडईकडे भाजीपाला घेऊन निघाला होता. समोरऊस भरलेला ट्रॅक्टर होता. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला सिग्नल किंवा रेडियम नव्हते. त्यामुळे टेम्पोचालकाला अंदाज आला नाही. टेम्पोने ट्रॅक्टरला जोरात धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की टेम्पोचा पुढचा भाग पूर्णपणे चुराडा झाला.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande