वेनेझुएलाच्या जनतेला आता फक्त अमेरिकन वस्तू खरेदी करता येणार - ट्रम्प
वॉशिंग्टन , 08 जानेवारी (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेनेझुएलाच्या जनतेसाठी एक आदेश जारी केला. या आदेशात ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, वेनेझुएलाच्या जनतेला तेलासंबंधी होणाऱ्या नव्या करारांतून जे पैसे मिळतील, त्यातून आता के
वेनेझुएलाच्या जनतेला आता फक्त अमेरिकन वस्तू खरेदी करता येणार - ट्रम्प


वॉशिंग्टन , 08 जानेवारी (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेनेझुएलाच्या जनतेसाठी एक आदेश जारी केला. या आदेशात ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, वेनेझुएलाच्या जनतेला तेलासंबंधी होणाऱ्या नव्या करारांतून जे पैसे मिळतील, त्यातून आता केवळ अमेरिकेत तयार झालेल्या वस्तूंचीच खरेदी करता येईल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर बोलताना सांगितले की, वेनेझुएलाचे लोक आता फक्त अमेरिकन बनावटीची उत्पादनेच खरेदी करतील. ट्रम्प यांनी पुढे नमूद केले की, नव्या तेल करारांमधून वेनेझुएलाच्या लोकांना जे उत्पन्न मिळेल, ते फक्त अमेरिकन उत्पादनांच्या खरेदीसाठीच वापरले जाईल. यात अमेरिकन कृषी उत्पादने, अमेरिकन औषधे, अमेरिकन वैद्यकीय उपकरणे तसेच वेनेझुएलाची विद्युत ग्रीड व्यवस्था सुधारण्यासाठी लागणारी उपकरणेही अमेरिकेतीलच असतील.

ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर वेनेझुएलाने अमेरिकेलाच आपला प्रमुख व्यापारी भागीदार मानावे लागेल. हा निर्णय वेनेझुएलासाठी शहाणपणाचा असून वेनेझुएला आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी तो अधिक फायदेशीर ठरेल. ट्रम्प यांनी हा निर्णय त्या वेळी घेतला आहे, जेव्हा अमेरिकन सैन्याने वेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande