
अकोला, 09 जानेवारी (हिं.स.)।
अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने आज दि. 9 जानेवारी 2026 रोजी मुख्य निवडणूक निरीक्षक अर्पित चौहान यांच्याव्दारे अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मा.राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारा स्ट्राँग रूम/मतमोजणी केंद्रांची आवश्यक असलेली सर्व सुसज्ज व्यवस्था बाबत पाहणी करण्यात आली.
यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक अर्पित चौहान यांनी झोन क्रं. 1 अंतर्गत अकोला जिल्हा मराठा मंडळ, रामदास पेठ, झोन क्रं. 2 अंतर्गत शासकीय धन्य गोडाऊन, जिल्हाधिकारी कार्यालय, झोन क्रं. 3 अंतर्गत निमवाडी पोलीस वसाहत येथील मल्टीपर्पज हॉल, झोन क्रं.4 अंतर्गत राजमाता जिजाऊ अभियंता प्रशिक्षण केंद्र रेल्वे स्टेशन जवळ, झोन क्रं. 5 अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, सिव्हील लाईन आणि झोन क्रं. 6 अंतर्गत शासकीय गोडाऊन, खदान यांचेसह मतदान केंद्रांची संख्या जास्त असलेली ईमारत ज्यामध्ये डाबकी रोड येथील मनपा उच्च प्राथमिक शाळा क्रं. 10, आकोट फैल येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्रं. 6, मनपा हिंदी बालक शाळा क्रं. 2, सिंधी कॅम्प येथील सिंधी हिंदी शाळा, मोठी उमरी येथील जि.प.प्राथमिक मराठी केंद्र शाळा क्रं. 1 आदी ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून महानगरपालिका प्रशासनाव्दारा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनंषंगाने केलेल्या सर्व व्यवस्थाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त तथा मनपा सार्वत्रिक निवडणूक नोडल अधिकारी सुमेध अलोने, मुख्य निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी सतीष गावंडे, मनपा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, महानगरपालिका सचिव अमोल डोईफोडे, मनपा आयुक्त यांचे स्विय्य सहायक जितेंद्र तिवारी आदींची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे