
नांदेड, 10 जानेवारी (हिं.स.) लातूरमध्ये शिक्षण घेणारी अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी चौकशी करण्याच्या मागणीसाठी नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावरील हिमायतनगर येथील चौकात येत्या सोमवारी दुपारी भव्य बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
लातुरात नवोदय विद्यालयात संशयास्पद मृत्यू झाला होता. घटना लातुर जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या हुशार मातंग समाजाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला नसुन, तो घातपात असुन विद्यालयातील पलंगाला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला आहे. अभ्यासाचा ताण की घातपात प्रशासनाने अद्याप स्पष्ट लेखी उत्तर दिलेले नाही. कुमारी अनुष्काचा घात झाला असल्याचा आरोप आई वडील आणि सामाजिक संघटनांनी केला आहे.
नवोदय विद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरा चेक करुन संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करुन त्यांच्यावर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करावा.
पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा. अशा घटना पुन्हा घडू नयेत या साठी कठोर पावले उचलली जावीत.स्वतंत्र एसआयटी चौकशी समिती नेमुन सदरील प्रकरणी
सखोल चौकशी करण्यात यावी. अन्यथा येणाऱ्या काळात मातंग समाज कायदा हातात घेतल्या शिवाय शांत बसणार नाही. या निषेधार्थ नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावरील चौकात येत्या सोमवारी दुपारी भव्य बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या भव्य बेमुदत रास्ता रोको आंदोलनाला तालुक्यातुन हजारोंच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे. कारण या चिमुकलीला न्याय मिळवुन देण्यासाठी समाजाच्या विविध सामाजिक संघटना सामील झाल्या आहेत. असे आवाहन धोंडोपंत बनसोडे व राजुभाऊ गायकवाड यांनी सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis