नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचे काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र
नांदेड, 10 जानेवारी, (हिं.स.) - नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस संपण्याची गिनती सुरू झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केला. भारतीय जनता पार्टी, नांदेड महानगरच्या वतीने प्रभाग कमांक १३, सिद्धार्थनगर येथे भव्य जाहीर
काँग्रेस संपण्याची गिणती गुरू झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केला.


नांदेड, 10 जानेवारी, (हिं.स.) - नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस संपण्याची गिनती सुरू झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केला. भारतीय जनता पार्टी, नांदेड महानगरच्या वतीने प्रभाग कमांक १३, सिद्धार्थनगर येथे भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेत मंचन जोंधळे, शांताबाई कोमटवार, नागेश डोकुलवार, भालचंद्र पत्की हे उमेदवार पस्थित होते. अशोकराव चव्हाण यांनी भाषणात काँग्रेसवर जोरदार टीका करत काँग्रेस संपण्याची उलटी गिनती सुरू झाली असून आता नेतृत्व उरलेले नाही असे म्हटले.

विरोधकांकडे विकासाचा कोणताही अजेंडा नसून ते केवळ टीका करत आहेत, असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत संविधानासमोर नतमस्तक झाले होते, मात्र काँग्रेसने संविधान बदलण्याचा अपप्रचार केला, असा आरोप करत भाजपला बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला मान देऊन भाजप सरकार काम करत असल्याचे सांगत सिद्धार्थनगर भागातील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले

सिद्धार्थनगर चौफाळा हा भाजपचा गड आहे, असे नमूद करत कमळ निशाणीवर मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रभाग क्रमांक १३ व १५ येथील एकमवार सिद्धनाथपुरी यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. अशोकराव चव्हाण म्हणाले, एकनाथ शिंदे रिक्षेवाले मुख्यमंत्री होऊ शकतात, तर बालाजी आमलखाने रिक्षावाले नगरसेवक का होऊ शकत नाहीत? भाजप हा देशात, महाराष्ट्रात आणि नांदेडमध्येही नंबर एक होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande