
नांदेड, 10 जानेवारी (हिं.स.)अर्धापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव अंतर्गत आरोग्य उपकेंद्र कामठा बु. येथे कर्करोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सगिता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न झाले.
या शिबिरास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम सावंत, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. डाढाळे, दंतरोग तज्ज्ञ डॉ. कोळेकर तसेच विस्तार अधिकारी डॉ. एस. पी. गोखले उपस्थित होते. तपासणीसाठी आलेल्या लाभार्थ्यांना कर्करोग आजाराविषयी माहिती देत वेळेवर तपासणीचे महत्त्व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई यांनी स्पष्ट केले. कामठा येथे झालेल्या कर्करोग तपासणी शिबिरात एकूण ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मुख कर्करोग तपासणी ९०, स्तन कर्करोग तपासणी ३९, गर्भाशयमुख कर्करोग २४ जणांची तपासणी करण्यात आली. तसेच एकूण १३ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis