मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा निवडणुकीतील टर्निंग पॉईंट असेल : पालकमंत्री गोरे
सोलापूर, 09 जानेवारी (हिं.स.)। शनिवार (दि. 10) होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट असेल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. गोरे यांनी सभा स्थळाची पाहणी करून आढावा घेतला. यंदाच्या महापालिक
मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा निवडणुकीतील टर्निंग पॉईंट असेल : पालकमंत्री गोरे


सोलापूर, 09 जानेवारी (हिं.स.)।

शनिवार (दि. 10) होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट असेल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. गोरे यांनी सभा स्थळाची पाहणी करून आढावा घेतला.

यंदाच्या महापालिका निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने शतप्रतिशत भाजपसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सर्व 26 प्रभागातून 102 उमेदवार दिले आहेत. या भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज शनिवारी दुपारी साडेबारा वाजता हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर जाहिर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे हे स्वतः या सभेच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. शुक्रवारी दुपारी या सभेच्या ठिकाणची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली, यावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, बिज्जू प्रधाने, विजय कुलथे यांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सोलापूरकरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूरकरांसाठी मोठया प्रमाणात योजना आणल्या असून, शहराचा पाणी पुरवठा पाईपलाईन, विमानसेवा, आयटी पार्क अशा अनेक योजना कार्यान्वित होत आहेत. देवभाऊ याबरोबर अनेक विकास कामांच्या योजना सोलापूरला देणार आहेत. त्यांची ही सभा या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट असल्याचे ना. गोरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यावेळी काय बोलणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. या सभेस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे

मुख्यमंत्री फडणवीस यांची सोलापूरला सभा होणार असल्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या सभेच्या तयारीसाठी भाजपाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. सभेसाठी मंडप उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. 50 फुटाचा स्टेज मारण्यात आला असून पाठीमागे भगव्या रंगाचे कापड लावण्यात आले आहे. सभेला आलेल्यांचे उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी मंडपावर छत घालण्यात आला आहे. महिलांसाठी स्वतंत्र आणि खास व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार असून गर्दीचे नियोजन कशा पध्दतीने करायचे याबाबत प्रशासन काम करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande