पीएनजी ज्वेलर्सतर्फे ‘चेन अँड बँगल्स महोत्सव’
* ग्राहकांसाठी खास सवलतींचा वर्षाव मुंबई, 09 जानेवारी (हिं.स.) : भारतातील विश्वासार्ह आणि वारसाहक्क लाभलेला दागिन्यांचा प्रतिष्ठित ब्रँड, ''पीएनजी ज्वेलर्स''ने २०२६ या नववर्षाचे स्वागत आपल्या बहुप्रतिक्षित ‘चेन अँड बँगल्स महोत्सवा’ने अतिशय दिमा
पीएनजी ज्वेलर्स चेन अँड बँगल्स महोत्सव


* ग्राहकांसाठी खास सवलतींचा वर्षाव

मुंबई, 09 जानेवारी (हिं.स.) : भारतातील विश्वासार्ह आणि वारसाहक्क लाभलेला दागिन्यांचा प्रतिष्ठित ब्रँड, 'पीएनजी ज्वेलर्स'ने २०२६ या नववर्षाचे स्वागत आपल्या बहुप्रतिक्षित ‘चेन अँड बँगल्स महोत्सवा’ने अतिशय दिमाखात केले आहे. ५ जानेवारीपासून देशभरात सुरू झालेल्या या महोत्सवामुळे ग्राहकांना सोन्याच्या चेन, तसेच सोने व हिऱ्यांच्या बांगड्यांच्या खरेदीवर आकर्षक सवलती मिळवण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

या उपक्रमाची माहिती देताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी भारतीय संस्कृतीतील दागिन्यांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, भारतीय विवाहसंस्कृतीत चेन आणि बांगड्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे केवळ दागिने नसून ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा वारसा आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांनी या मौल्यवान दागिन्यांमध्ये गुंतवणूक करावी आणि या योजनांचा लाभ घ्यावा, अशी आमची इच्छा आहे. मूल्य, वैविध्य आणि उत्कृष्ट कारागिरी यांचा त्रिवेणी संगम साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

या अंतर्गत ग्राहकांना सोन्याच्या चेन आणि बांगड्यांच्या खरेदीवर घडणावळीमध्ये (मेकिंग चार्जेस) प्रति ग्रॅम तब्बल ५१५ रुपयांची थेट सवलत दिली जात आहे. एवढेच नव्हे तर, हिऱ्यांच्या बांगड्यांच्या घडणावळीवर थेट ५० टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. ही खास ऑफर ५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत पीएनजी ज्वेलर्सच्या सर्व शोरूम्समध्ये उपलब्ध असेल, असे व्यवस्थापनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

सण-समारंभ असो किंवा दैनंदिन वापर, प्रत्येक प्रसंगासाठी साजेसे दागिने उपलब्ध करून देणे हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे. या विशेष उपक्रमात दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या हलक्या दागिन्यांपासून ते खास प्रसंगांसाठीच्या जड आणि नक्षीदार दागिन्यांपर्यंतची विस्तृत श्रेणी ग्राहकांसाठी खुली करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने उत्तम दर्जाच्या सोन्याच्या चेन, सुबक सोन्याच्या बांगड्या आणि अतिशय सुंदर अशा हिऱ्यांच्या बांगड्यांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande