पाम तेल क्षेत्रातील नवोपक्रमासाठी गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप आणि मलेशियामध्ये सहकार्याची चर्चा
बंगळुरू, 01 ऑक्टोबर (हिं.स.)। मलेशियाचे प्लान्टेशन आणि कमोडिटीज मंत्री, वायबी दातुक सेरी डॉ. नोराइनी अहमद यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय मलेशियन शिष्टमंडळासोबत एका बैठकीचे गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आयोजन केले. या शिष्टमंडळात वृक्षारोपण आणि वस्
पाम तेल क्षेत्रातील नवोपक्रमासाठी गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप आणि मलेशियामध्ये सहकार्याची चर्चा


बंगळुरू, 01 ऑक्टोबर (हिं.स.)। मलेशियाचे प्लान्टेशन आणि कमोडिटीज मंत्री, वायबी दातुक सेरी डॉ. नोराइनी अहमद यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय मलेशियन शिष्टमंडळासोबत एका बैठकीचे गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आयोजन केले.

या शिष्टमंडळात वृक्षारोपण आणि वस्तू मंत्रालय, चेन्नईमधील मलेशियाचे महावाणिज्यदूत, मलेशियन पाम ऑइल कौन्सिल, मलेशियन पाम ऑइल बोर्ड आणि मलेशियन सस्टेनेबल पाम ऑइल येथील प्रतिनिधींचा समावेश होता. चर्चेमध्ये ग्रुपच्या व्यवसायांमधील परस्पर हिताच्या क्षेत्रांचा, विशेषतः पाम तेलातील नवोपक्रम आणि घरगुती कीटकनाशक क्षेत्राचा समावेश होता.

गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतच्या चर्चेदरम्यान, दोन्ही बाजूंनी पाम तेलाच्या अपस्ट्रीम क्षेत्रातील संधींचा शोध घेतला. भारतातील विविध कृषी-हवामान परिस्थितीला अनुकूल अशा उच्च-कार्यक्षम पाम तेलाच्या जाती विकसित करण्यासाठी प्रगत संशोधन आणि वैज्ञानिक साधनांच्या वापरावरही त्यांनी विचारांची देवाणघेवाण केली.

या क्षेत्रातील अधिक घनिष्ठ सहकार्यामुळे स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या लागवड साहित्याच्या विकासाला चालना मिळू शकते, उत्पादकता आणि टिकाऊपणात सुधारणा होऊ शकते, तसेच भारताच्या दीर्घकालीन खाद्यतेलाच्या सुरक्षेत योगदान मिळू शकते.

गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडसोबत झालेल्या चर्चेत घरगुती कीटकनाशक क्षेत्रावर आणि त्याच्या वाढीस पोषक व्यावसायिक वातावरण मजबूत करण्याच्या संधींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या क्षेत्राच्या शाश्वत विकासाला पाठिंबा देताना व्यापार आणि नवोपक्रमाला चालना देण्यावरही दोन्ही बाजूंनी विचारांची देवाणघेवाण केली.

मलेशियाच्या वृक्षारोपण आणि वस्तू मंत्री, वायबी दातुक सेरी डॉ. नोराइनी अहमद म्हणाल्या, “आर्थिक वाढ तसेच अन्न सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या विविध क्षेत्रांमध्ये मलेशिया आणि भारताचे दीर्घकालीन संबंध आहेत. आजच्या चर्चेमुळे आम्हाला संशोधन, नवोपक्रम, व्यापार आणि शाश्वतता या क्षेत्रांमध्येही घनिष्ठ सहकार्याच्या अधिक संधी शोधता आल्या.”

“या सहभागामुळे आम्हाला अशी क्षेत्रे ओळखण्यास मदत होते, जिथे मलेशियन आणि भारतीय उद्योग क्षेत्रातील कंपन्या एकत्र काम करून मूल्य निर्मिती करू शकतात.”

या बैठकीवर भाष्य करताना, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे ग्रुप प्रेसिडेंट आणि कॉर्पोरेट अफेअर्सचे प्रमुख, राकेश स्वामी म्हणाले, “वेगाने बदलणाऱ्या जगात कृषी आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भागीदारी तसेच ज्ञानाची देवाणघेवाण महत्त्वाची आहे.”

“मलेशियन शिष्टमंडळासोबतच्या आमच्या चर्चेतून पाम तेलामध्ये विज्ञान-आधारित नवोपक्रमाला चालना देण्याच्या आणि घरगुती कीटकनाशक क्षेत्राला आधार देणारी परिसंस्था मजबूत करण्याच्या संधी समोर आल्या आहेत. आमच्या दृष्टीने हे सहकार्य महत्त्वाचे असून दोन्ही देशातील शेतकरी, ग्राहक आणि उद्योगांना लाभ देणाऱ्या पुढील सहकार्यासाठी उत्सुक आहोत.”

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande