
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।
आईसाहेब लॉन्स, हर्सूल, छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले होते. विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. फुलंब्री तालुक्यातील पाल गावच्या कुमारी राजनंदिनी सतीश जाधव यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
कराटेसारख्या खेळातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि शिस्त विकसित होते. एका युवतीने पुढाकार घेऊन असा उपक्रम आयोजित करणे आणि त्यातून नवे खेळाडू घडवणे, ही कौतुकास्पद बाब आहे. कुमारी राजनंदिनी जाधव यांना तसेच सहभागी सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. असे आमदार सुहास शिरसाठ म्हणाले.
या स्पर्धेस माझ्यासह जिल्हाध्यक्ष भाजपा श्री सुरेशजी बनकर सभापती श्री सर्जेराव मेटे, जिल्हा परिषद सदस्य, श्री आजिनाथ धामणे श्री ज्ञानेश्वर जाधव , नगरसेवक श्री देविदास डांगरे श्री मनोज मुळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis